घरच्या पद्धतीने बनवा रव्याच्या शंकरपाळ्या

घरच्या पद्धतीने बनवा रव्याच्या शंकरपाळ्या

दिवाळी म्हटली की खरेदी, साफसफाई, फराळ अशा गोष्टींची तयारी चालू असते. तसेच १५ दिवस अगोदरच फराळाच्या पदार्थांचीही तयारी सुरू झालेली असते. फराळाचे पदार्थ म्हंटले की ते स्वादिष्ट हवेच त्यासाठी महिला खूप पर्यंत करत असतात. फराळाचा पदार्थ फुटू नये म्हणून देखील महिला पर्यंत करत असतात. तसेच आपण दिवाळी मध्ये शंकरपाळी , करंज्या , लाडू , असे पदार्थ बनवतो आणि ते खाण्यासाठी देखील खूप स्वादिष्ट असतात. तर आज आम्ही तुम्हाला रव्या पासून शंकरपाळी कशी बनाव्याची ते सांगणार आहोत. जाणून घ्या रेसिपी.

हे ही वाचा: तुम्ही चाहप्रेमी आहात का? तर चहासोबत या पदार्थाचे सेवन करू नका

 

फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. शंकरपाळी मध्ये मैद्या न वापरता रवा वापरणे. मैद्याची शंकरपाळी जितकी खुसखुशीत होते. तितकीच रव्याची शंकरपाळीही खुसखुशीत होते.

साहित्य –

रवा १.५ वाटी

तूप अर्धी वाटी

पिठीसाखर पाऊण वाटी

दूध पाव वाटी

मैदा पाव वाटी

तेल तळण्यासाठी २ ते ३ वाट्या

 

कृती –

सर्व प्रथम रवा मिक्सकर मध्ये बारीक वाटून घेणे. बारीक वाटून घेल्यानंतर त्याचे पीठ तयार होते. जे शंकरपाळी साठी खूप चांगले असते.

बारीक केलेल्या रव्यामध्ये तूप मिक्सकरून घालणे. आणि चांगले ढवळून घेणे. ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर मिक्सकरने.

मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्या मध्ये थोडा मैदा मिक्स करणे.

हे पीठ मळताना दुधामध्ये मिक्सकरून मळावे. आणि पीठ मळताना थोडे थोडे दूध घ्यावे. आणि मऊ पीठ मळावे.

पीठ मळून झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून घेणे. आणि चपातीच्या आकारावर लाटून घेणे. लाटून झाल्यानंतर लहान आकारात शंकरपाळी कट करून घ्यावी.

आणि तेलात किंवा तुपात चांगल्या तळून घेणे.

हे ही वाचा:

Crab : खेकडा खाण्याचे फायदे

 

Exit mobile version