Saturday, September 7, 2024

Latest Posts

अश्या योग्य पद्धतीचा वापर करून बनवा सॉफ्ट आणि चविष्ट पराठा…

पराठा हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे बनवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचप्रकारे कोणत्या योग्य पद्धतीने पराठा बनवायचा हे आपण पाहू.

बऱ्याच जणांचा पराठा हा सर्वात आवडता पदार्थ असतो. पराठा हा चपाती सारखाच वाटणारा पण किंचित वेगळा असणारा पदार्थ आहे. या पदार्थाचा कधीही खायला कंटाळा येत नाही. त्याउलट पराठा हा जेवणाची चव आणखी वाढवतो. ज्यात विविध प्रकारचे स्टफीन्ग (stuffing) वापरले जाते. म्हणजेच त्यात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. काही ठिकाणी सरळ व सोप्या पद्धधतीचे पराठे बनवले जातात पण काही ठिकाणी पराठ्यांचे सुद्धा विविध प्रकार बनवले जातात. मेथी पराठा, पालक पराठा, बटाट्याचा पराठा, कोबी पराठा, मुळ्याचा पराठा,पनीर पराठा (Methi Paratha, Spinach Paratha, Potato Paratha, Cabbage Paratha, Radish Paratha, Paneer Paratha) अश्या बऱ्याच प्रकारचे आणि बऱ्याच पद्धतीत आपण पराठा बनवू शकतो. कोणत्या हि वेळी आपल्याला खाता येतो त्याला खाण्यासाठी कोणती अशी ठराविक वेळ नसते. त्यामुळे सकाळ, दुपार किंवा रात्री देखील आपण पराठा खाऊ शकतो. विविध भाज्यांचा यात समावेश असल्यामुळे लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा पराठा हा पदार्थ अतिशय आरोग्याला पोषक (Nutrient to health) ठरतो. साहित्य: गव्हाचे पीठ- २ वाटी मैदा- २ वाटी तेल किंवा तूप पाणी- आवश्यक्यतेनुसार मीठ-आवश्यक्यतेनुसार कृती: गव्हाच्या पिठात मीठ (salt) टाकून आवश्यक्यतेनुसार पाणी (water) घालून अलगद हाताने कणिक मळून घ्या. ते कणिक एकजीव होण्यासाठी तेल (oil) किंवा तुपाचाही (ghee) वापर करू शकता. हे कणिक हळुवार हाताने मळून घेतल्या नंतर ते नीट मुरण्यासाठी ओल्या कपड्या मध्ये थोड्या वेळासाठी झाकून ठेवावे आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा मळून घ्यावे म्हणजे ते कणिक आपल्याला पराठे बनवण्यासाठी एकदम तयार होईल मग तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीचे पराठे लाटून तयार करु शकता. अश्याप्रकरे कणिक पाळण्याची योग्य पद्धत वापरून तुम्ही चविष्ट पदार्थ बनवू शकता. हा बनवताना काही जण बऱ्याच चुका करतात त्यामुळे तो पराठा व्यवस्थित बनत नाही. नेहमी प्रमाणे जसे चपातीचे कणिक मळले जाते त्याच प्रमाणे पराठ्याचेही कणिक मळले जाते. त्यामुळे त्याच्या आत असलेले स्टफीन्ग (stuffing) बाहेर पडून पराठा फुटतो.

Latest Posts

Don't Miss