प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बनवा खास तांदळाची खीर

अयोध्येमध्ये ५०० वर्षेनंतर प्रभू श्री राम हे विराजमान होणार आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बनवा खास तांदळाची खीर

अयोध्येमध्ये ५०० वर्षेनंतर प्रभू श्री राम हे विराजमान होणार आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशवासीय उत्सुक आहेत. राम मंदिराच्या लोकर्पण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. प्रभू श्री रामाचे तेजस्वी रूप पाहून सर्वच राम भक्तांना मोठा आनंद झाला आहे. सगळीकडे राममय वातावरण निर्माण झाले आहे. हातामध्ये धनुष्यबाण, चेहऱ्यावर गोड हास्य आणि प्रभू रामांचे तेजस्वी रूप पाहून अनेकांचे डोळे सुद्धा पाणावले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारी हा शुभ दिवस निवडण्यात आला आहे. या दिवशी तुम्हाला सुद्धा गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही तांदुळाची खीर बनवून सगळ्यांना खुश करा.

साहित्य :-

एक वाटी तांदूळ
अर्धा लिटर दूध
पाणी
वेलची पावडर
काजू बदाम ( आवश्यतेनुसार)
साखर दीड वाटी

कृती:-

सर्वप्रथम तांदूळ साफ करून तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर पुन्हा एका वाटीत पाणी घेऊन तांदूळ भिजत ठेवा. त्यानंतर तांदूळ पाणी घालून चांगले शिजवून घ्या. तांदूळ मऊ शिजून झाल्यानंतर त्यात दूध घालून पुन्हा एकदा मध्यम आचेवर शिजवून घ्या. दूध घातल्यानंतर खीर वारंवार चमच्याने ढवळून घ्या. सतत ढवळत न राहिल्यास खीर चिटकू शकते. त्यामुळे खीराला जळका वास येऊ शकतो. त्यानंतर त्यात वेलची पूड, दीड वाटी साखर, काजू बदाम घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर खीर पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घ्या. खीर शिजल्यानंतर गॅस बंद करून तुम्ही तांदुळाची खीर सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा:

लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची, नाना पटोले

आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची बस जमावाने अडवली, आणि…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version