घरच्या घरी तयार करा चटपटीत गाजराचे लोणचे

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारामध्ये गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

घरच्या घरी तयार करा चटपटीत गाजराचे लोणचे

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारामध्ये गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. आपण नेहमीच गाजरचे सॅलड किंवा गाजराचा हलवा बनवून खातो. पण तुम्ही कधी गाजराचे लोणचे खाल्ले आहे का ? जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर जेवायलासुद्धा मजा येते. ताटात लोणचं असेल तर दोन घास जेवण जास्त जात. हिवाळ्यामध्ये कैरी, मिरची, आवळा आणि इतर काही लोणची आपण बनवतो. पण तुम्ही कधी गाजराचे लोणचं बनवले आहे का ? नसेल बनवलं तरी नक्की बनवून पाहा. यंदा घरच्या घरी गाजराचे लोणचं कसे बनवायचे हे आपण पाहूया.

साहित्य:-

२ गाजर,मीठ,बडीशेप,जिरं,मेथी दाणे,मोहरीचे दाणे,हिंग,लाल तिखट,हळद,लिंबाचा रस

कृती:-

सर्वप्रथम गाजराचे लोणचं बनवण्यासाठी बाजारातून गाजर आणून ते नीट स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून तुम्हाला हव्या असलेल्या आकारामध्ये कापून घ्या. त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ टाका. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, जिरं आणि मेथी दाणे याची पावडर करून घ्या. पावडर करून झाल्यानंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढईमध्ये २ चमचे तेल घालून ते गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेले आलं, मोहरीचे दाणे, अर्धा चमचा हिंग, बारीक चिरलेला गाजर घेऊन त्यामध्ये टाका.नंतर २ मिनिटाने त्यात एक चमचा लाल तिखट, हळद, वाटलेली पावडर टाकून मिक्स करून घ्या. २ ते ३ मिनिटं झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या आणि गाजर मंद आचेवर शिजवून घ्या. तयार आहे चटपटीत गाजराचे लोणचे. 

हे ही वाचा:

प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, राज्यात असाच ‘गुंडाराज’ होत असेल, तर….

आमदार आदित्य ठाकरेंची शिंदे फडणवीस सरकारवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version