घरगुती पद्धतीने बनवा श्रीखंड आणि मोहनथाळ, जाणून घ्या रेसिपी…

घरगुती पद्धतीने बनवा श्रीखंड आणि मोहनथाळ, जाणून घ्या रेसिपी…

सण म्हटले की गोडाचे पदार्थ आले. आणि गोड पदार्थ खायाला सर्वांना आवडतात. तसेच आजकाल पदार्थ मध्ये भेसळीचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. आपण हॉटेल सारखे पदार्थ घरात देखील बनवू शकतो. दिवाळीतुन बाहेरून पदार्थ आण्यापेक्षा घरात बनवणे खूप बरे पडते. तसेच सण म्हटले की पदार्थ खूप महाग मिळतात. कधी कधी ते आपल्या खिसला झेपत देखील नाही. दिवाळीच्यानिमित्ताने अनेक पाहुणे, नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येत असतात. मग घरी कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पडतो असतो. असा वेळी तुम्ही श्रीखंड किंवा मोहनथाळ देखील बनवू शकता. तसेच हे पदार्थ आपण घरच्या सामानाने झटपट बनवता येतात. चला मग जाणून घेऊया रेसिपी.

हे ही वाचा:  Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीला घर सजवा ‘या’ खास दिव्यांनी

 

श्रीखंड बनवण्याचे साहित्य –

केशर एक चिमूटभर

दही १ किलो

पिठीसाखर १ वाटी

उकळलेले दूध २ टीस्पून

जायफळ पावडर १ टीस्पून

बारीक वेलाची पावडर टीस्पून

बदाम

पिस्ता

 

कृती –

सर्व प्रथम एका भांड्यात दही लावून फ्रिज मध्ये रात्रभर ठेवा. श्रीखंड बनवताना त्यामधील पाणी काढून घेणे. त्यानंतर त्या दही मध्ये पिठीसाखर मिक्सकरून घ्या. आणि त्यामध्ये कोमट दूध गरम करून घ्या. दूध कोमट झाल्यानंतर त्यामध्ये केसर मिक्सकरून घ्या. आणि ते मिश्रण थंड झाल्यानंतर दही मध्ये मिक्सकरून घ्या. त्या नंतर तयार केलेल्या मिश्रणामध्ये जायफळ आणि वेलची पावडर घालून एकत्र करून घ्या. नंतर ते मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणे. त्यानंतर श्रीखंड फ्रिज मध्ये काढून त्यावर काजू बदाम पिस्ता मिक्सकरून घेणे.

मोहनथाळ बनवण्यासाठी साहित्य –

बेसन २ कप

तुप १ कप, ३ चमचे

दूध ६ टीस्पून

साखर कप

गुलाबपाणी १ टीस्पून

वेलची पावडर १टीस्पून

केशर १ टीस्पून

बारीक चिरेला पिस्ता १ टीस्पून

बारीक चिरलेली बदाम १ टीस्पून

कृती –

सर्व प्रथम कोमट पाणी करून घ्या. आणि त्यामध्ये केसर मिक्सकरून घ्या. नंतर बेसनाच्या पिठात तूप आणि दूध घालून एकत्र करून घ्या. या पिठात गुठळ्या येणार नाही याची काळजी घेणे. नीट एकजीव होण्यासाठी मिश्रण झाकून ठेवणे. अर्ध्या तासानंतर हे पीठ हाताने फोडून जाड छिद्रे असलेल्या चाळणीने चाळून घ्या. तांब्याच्या भांड्याला तूप लावून ते १ मिनीटासाठी मंद आचेवर गरम करा. बेसनचे पीठ घालून गरम करायला ५ मिनिटे ठेवा. हे मिश्रण सतत ढवळत रहा. मिश्रण तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर हे मिश्रण १५ मिनीटांपर्यंत थंड करा.

आता १ कप पाण्यात साखर घाला आणि शिजवा. हे पाणी उकळायला लागले की, त्यात २ चमचे दूध मिसळा. आता हे मिश्रण मंद आचेवर ढवळत असताना ३-४ मिनिटांसाठी शिजवून घ्या. पाक झाला की आता त्यात गुलाबजल टाकून बाजूला ठेवणे. थंड झालेल्या बेसनामध्ये केशर पाणी, वेलची पूड आणि साखरेचा पाक मिक्स करून ३-४ मिनिटांसाठी ढवळत रहा. यानंतर हे मिश्रण ताटात थापून वड्या पाडून घ्या.

हे ही वाचा:  

शिंदे गटात वाद :आमदाराने साधला आपल्याच मंत्र्यावर निशाणा

 

Exit mobile version