ओट्स आणि मूगडाळी पासून बनवा गोड, चविष्ट आणि हेल्दी Dahiwada!

सर्वप्रथम उडीद डाळ आणि मूगडाळ स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सर्व पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

ओट्स आणि मूगडाळी पासून बनवा गोड, चविष्ट आणि हेल्दी Dahiwada!

दहीवडा म्हटलं की लहान असो की मोठा प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. अनेक लोकांना दहीवडा खूप आवडतो परंतु अनेकदा वजन वाढीच्या भीतीने अनेकजण दहीवडा खाणे टाळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओट्स (Oats) आणि मूगडाळपासून (Mung Bean) हेल्दी दहीवडा कसा बनवायचा याविषयी सांगणार आहोत. हा दहीवडा बनवायला सुद्धा अत्यंत सोपा आहे. तसेच चवीला सुद्धा खमंग आहे.

सध्या सर्वांना आपल्या फिटनेसची चिंता आहे. शारीरिक स्थिरता मिळवण्यासाठी लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात. व्यायाम करताना योग्य डाएट फॉलो करणे आवश्यक असते. आरोग्याबाबत काळजी घेणाऱ्या लोकांच्या आहारामध्ये ओट्स हा पदार्थ हमखास आढळतो. सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याला ओट्स खाल्ले जातात. काहींना हा पदार्थ इतका आवडतो की, ते ओट्स खाऊन मगच व्यायाम करतात. म्हणूनच फिटनेस फ्रिक लोकांसोबत सर्वांसाठी टेस्टी, हेल्थी आणि गोड दहीवडा कसा तयार करावा जाणून घेऊया.

हेल्दी दहीवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

भाजून पूड केलेले ओट्स अर्धा कप
उडीद डाळ पाव कप
मूगडाळ अधा कप
हिरवी मिरची १
कडीपत्ता ३-४ पाने
आलं १ छोटा तुकडा
मीठ चवीनुसार
तेल तळण्याकरिता

दह्याच्या मिश्रणाकरिता –

दही १ कप
साखर १ चमचा
मीठ चवीनुसार
जिरे पूड पाव चमचा
लाल तिखट पाव चमचा

हेल्दी दहीवडा बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम उडीद डाळ आणि मूगडाळ स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सर्व पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.वाटून घेतलेले मिश्रण भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून तीन-चार तासांकरिता ठेवा. त्यानंतर त्यामध्ये ओट्स पावडर आणि मीठ घालून ठेवा. ५ मिनिटांनंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कडीपत्ता, आलं घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून काढा. मिक्सर मधून काढल्यानंतर मिश्रणाला वड्याचा आकार देऊन तळून घ्या. नंतर पाण्यात घालून हाताने दाबून घ्या. तसेच दह्यामध्ये साखर, मीठ, जिरे पूड आणि लाल तिखट एकत्र करून वड्यावर हे दही घाला. १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून खाण्यास द्या.

हे ही वाचा:

Makhana Dosa कधी ट्राय केला आहे का? नसेल तर आता नक्कीच ट्राय करा…

बच्चू कडू शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version