घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

सर्वप्रथम ओव्हन ३५० डिग्री फिरेनाईट तापमानावर तापवा. यानंतर कुकीशिटला ब्रशने ओव्हनच्या भांड्याला तेल लाऊन घ्या. नंतर बटर, ब्राऊन शुगर, अंड आणि पाणी एकत्र करून चांगले फेटून घ्या.

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

अनेकांना चविष्ट असे कुकीज खायला खूप आवडतात. परंतु मार्केटमधून विकत आणलेल्या कुकीजमध्ये मैद्याचे प्रमाण हे प्रचंड प्रमाणात असते. मैद्याचे अतिसेवन आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. जर तुम्हाला कुकीज आवडत असेल तर ओट्स आणि हनी पासून बनविलेले हेल्दी कुकीज हे बेस्ट ऑप्शन आहे. म्हणूनच आज आपण हे कुकीज घरच्याघरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत.

सध्या सर्वांना आपल्या फिटनेसची चिंता आहे. शारीरिक स्थिरता मिळवण्यासाठी लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात. व्यायाम करताना योग्य डाएट फॉलो करणे आवश्यक असते. आरोग्याबाबत काळजी घेणाऱ्या लोकांच्या आहारामध्ये ओट्स हा पदार्थ हमखास आढळतो. सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याला ओट्स खाल्ले जातात. काहींना हा पदार्थ इतका आवडतो की, ते ओट्स खाऊन मगच व्यायाम करतात. म्हणूनच फिटनेस फ्रिक लोकांसोबत सर्वांसाठी टेस्टी आणि हेल्थी कुकीज कशा बनवल्या जातात चला जाणून घेऊयात.

हेल्दी कुकीज तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

मोठे चमचे बटर
अर्धा कप ब्राऊन शुगर
पाव कप मध
एक अंड
एक मोठा चमचा पाणी
अर्धा कप गव्हाचे पीठ
अर्धा चमचा मीठ
पाव चमचा बेकिंग सोडा
दीड कप ओटस
हवे असल्यास खजूर
काजू अथवा काळ्या मनुकांचे काप

हेल्दी कुकीज बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम ओव्हन ३५० डिग्री फिरेनाईट तापमानावर तापवा. यानंतर कुकीशिटला ब्रशने ओव्हनच्या भांड्याला तेल लाऊन घ्या. नंतर बटर, ब्राऊन शुगर, अंड आणि पाणी एकत्र करून चांगले फेटून घ्या. साहित्यांमध्ये घेतलेले कोरडे पदार्थ एकत्र करून ते ओट्समध्ये घाला. तसेच कोरडे आणि ओलसर सर्व पदार्थ एकत्र करून मिश्रण तयार करा. कुकीजशीटवर मिश्रणाचे गोळे घालून १२ ते १५ मिनिटे मिश्रण बेक करा. त्यानंतर कुकीज थंड करून त्यांचा आस्वाद घ्या.

हे ही वाचा:

जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होऊ शकतो, अंबादास दानवेंचे कोश्यारी यांना पत्र

Adipurush बॉक्स ऑफिसवर पास, परंतु प्रेक्षकांकडून नापास | manoj muntashir | Bollywood

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version