शिळ्या पोळीपासून बनवा टेस्टी समोसा

शिळ्या पोळीपासून बनवा टेस्टी समोसा

काही जण शिळ्या चपात्या फेकून देतात. त्या चपात्या फेकण्यापेक्षा त्यापासून काहीतरी पदार्थ बनवणे कधीही चांगले असते. शिळ्या पोळीपासून तुम्ही भरपूर पदार्थ बनवू शकता. तसेच तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पडत असतो. तर तुम्ही शिळ्या पोळीपासून समोसे देखील बनवू शकता. लहान मुलांना वेगवेगळे पदार्थ खायाला खूप आवडतात. आणि रोज रोज तेच पदार्थ खाऊन मुले देखील कंटाळतात. जर मुलांना काही वेगळा आणि नवीन पदार्थ दिला तर मुले आवडीने खातात. तसेच तुम्ही हा पदार्थ मुलाच्या टिफिनसाठी देखील देऊ शकता. तर चला मग जाणून घेऊया शिळ्या पोळी पासून समोसा कश्या पद्धतीने बनवायचा.

हे ही वाचा :नाश्त्यासाठी बनवा कोबीची वडी, जाणून घ्या रेसिपी…

 

समोस्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

उरलेल्या पोळ्या
पनीर
मेयोनीज
चीज
तेल, टोमॅटो सॉस आणि काही मसाले

 

कृती –

सर्व प्रथम पोळीचे अर्धे अर्धे भाग करून करून घेणे. आणि सामोसे तयार करून घेणे.

त्यानंतर एका कढईत तेल घालून घेणे आणि तेल चांगले गरम करून घेणे. त्या तेलामध्ये पनीर, टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, थोडंसं मीठ टाका आणि पनीर चांगले परतून घ्या.

मग पोळीला मेयोनीज लावून घ्या.

त्यानंतर मेयोनीज पोळीला लावून झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेलं पनीर, चीज किसून घाला. सामोस्याप्रमाणे त्याला त्रिकोणी आकारात बनवून घ्या.

त्याला दोन्ही बाजूंनी बटर लावा आणि मग सॅण्डविज मेकरमध्ये ठेवून ते चांगले भाजून घ्या.

गरमागरम रोटी सामोसा तयार.

हे ही वाचा :

कशी तयार करायची केळीची कचोरी ? जाणून घ्या रेसिपी…

 

Exit mobile version