spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी

पितृपक्षात तयार केला जाणाऱ्या नैवेद्यामध्ये अनेक पदार्थ असतात. त्यामुळे वेळ वाचावा यासाठी अनेक भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी बनवली जाते.

हिंदू पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष हा १८ सप्टेंबर पासून सुरु होत आहे तर त्याची सांगता २ ऑक्टोबरला होणार आहे. पितृपक्षात आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातात अशी मान्यता आहे. या वेळी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी लोक तर्पण, पिंडदान आणि ब्राम्हण भोजन करतात. श्राद्धात प्रसादशी संबंधित काही खास नियम आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. या दिवशी नैवेद्यामध्ये मिक्स भाजी केली जाते. काही ठिकाणी ही भाजी वेगवेगळी सुद्धा केली जाते. पितृपक्षात तयार केला जाणाऱ्या नैवेद्यामध्ये अनेक पदार्थ असतात. त्यामुळे वेळ वाचावा यासाठी अनेक भाज्या एकत्र करून त्याची मिक्स भाजी बनवली जाते. पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या मिश्र भाजीची रेसिपी काय आहे हे थोडक्यात पाहूया.

साहित्य:

  • बटाटा २
  • भेंडी एक वाटी
  • गवार एक वाटी
  • मेथी एक वाटी
  • लाल भोपळा
  • कारली एक वाटी
  • हिरव्या मिरचीचा ठेचा
  • लसूण पाकळ्या
  • मीठ चवीनुसार
  • मोहरी
  • जिरे
  • तेल

कृती:

  • सर्व प्रथम साहित्य काढून घ्या.
  • भाज्या निवडून कट करून घ्या.
  • मेथीची भाजी धुवून घ्या आणि पाणी काढून घ्या.
  • भेंडी धुवून पुसून मग कट करून घ्या.
  • लसूण पाकळ्या व हिरव्या मिरच्या काढून घ्या.
  • मिक्सर मधून काढून ठेचा करून घ्या.
  • चवीनुसार मीठ काढून घ्या.
  • बटाटा कुकर मध्ये उकडून घ्या आणि सोलून घ्या.
  • आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल घालून घ्या.
  • तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे घालून फोडणी करावी हळद घालून घ्या कढीपत्ता घालून फोडणी करावी नंतर त्यात
  • हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्या आणि फोडणीमध्ये सर्व भाज्या एक एक करून घालून चांगले परता.
  •  त्यात धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला घालून चांगले मिक्स करा.
  • भाज्या चांगल्या शिजल्यानंतर त्यात मीठ घाला.
  • २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून भाज्या चांगल्या वाफवून घ्या.

हे ही वाचा:

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss