Wednesday, September 25, 2024

Latest Posts

घरगुती पद्धत वापरून तिरुपतीचा लाडू बनवा घरीच; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

दक्षिण भारतामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आणि स्थळे आहेत जी त्यांच्या सुंदरतेमुळे आणि भव्यतेमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. ज्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक तिकडे भेट देत असतात. केवळ भारतातीलच नाही तर देश विदेशातील लोक तिकडे भेट देतात. त्यातीलच मुख्य आकर्षण म्हणजे तिरुपती मंदिर. तिरुपती बालाजीचे मंदिर हे आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिरात लाखो करोडोंचे दान होते त्यामुळे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. तिरुपतीला गेल्यावर अनेक लोक आपले केस दान करतात. तसेच बऱ्याच नागरिकांना त्या मंदिरातील प्रसादाचा लाडू फार आवडतो. या प्रसादाच्या लाडूवर कापुर ठेवला जातो, हे या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य आहे. लाडूची चव ही विशेष असते. पण तुम्हीही तुमच्या घरी असाच लाडू सोप्या पद्धतीत बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात तिरुपती लाडू बनवण्याची साहित्य आणि कृती.

तिरुपती लाडू बनवण्यासाठीचे साहित्य:
१) एक वाटी चणा डाळ (चार ते पाच तास दूधात भिजवलेली)
२) दुधात भिजवलेलं केशर
३) एक वाटी तूप
४) एक वाटी साखर
५) एक वाटी दूध
६) खडीसाखर
७) ड्रायफ्रुटस
८) प्रसादाचा कापूर

तिरुपती लाडू बनवण्याची कृती:
१) तिरुपती लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम चणाडाळ स्वच्छ धुवूनच चार ते पाच तास भिजत ठेवावी. त्यानंतर ती बारीक वाटून घ्यावी.
२) त्यानंतर एका भांड्यात तूप गरम करून घ्या आणि चणाडाळीचे बारीक केलेले मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.
३) मिश्रण परतून घट्ट झाल्यावर त्यात साखर टाकून पुन्हा नीट परतून घ्या आणि त्यात केशराचे दूध घालून गॅस बंद करून टाका.
४) मिश्रण थंड झाल्यावर त्यात ड्रायफ्रुटस, खडीसाखर आणि कापूर टाकून नीट मिक्स करून घ्या आणि त्याचे लाडू करा.

अश्या सोप्या पद्धतीने तुमचे तिरुपती मंदिरातील प्रसादाचे लाडू घरच्या घरी तयार होतील.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss