नारळापासून बनवा ओल्या खोबऱ्याचे लाडू

नारळाचे दूध देखील खूप लोकप्रिय आहे. आज जाणून घेऊया ओल्या खोबऱ्यापासून खोबऱ्याचे लाडू कसे बनवले जातात.

नारळापासून बनवा ओल्या खोबऱ्याचे लाडू

नारळाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर केला जातो. ओल खोबर हे भाजीमध्ये ही वापरले जाते. खोबऱ्यापासून खूप प्रकारचे पदार्थ बनवता येतात. ओल खोबर खाल्याने पोटही साफ होते. नारळामध्ये व्हिटॅमिन,फायबर,कॅल्शिअम,आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. खोबऱ्याचे लाडू आपण सणांसाठी घरी खाण्यासाठी कधीही बनू शकतो . नारळाचे फळ एखाद्याच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि तंतु पदार्थांसारख्या अनेक पोषक असतात. नारळापासून पिण्याचे पाणी पिऊन ग्लूकोज आणि पाण्याची कमतरता उपचार केली जाते. नारळ तेलाचा उपयोग स्वयंपाकात होतो आणि हे तेल केसांसाठी देखील चांगले असते. नारळाचे दूध देखील खूप लोकप्रिय आहे. आज जाणून घेऊया ओल्या खोबऱ्यापासून खोबऱ्याचे लाडू कसे बनवले जातात.

रेसिपी –

साहित्य –

कृती –

सर्व प्रथम मिक्सर ग्राईन्डर मध्ये नारळाचे कापे बारीक वाटून किस तयार करून घेणे. त्यानंतर पॅनमध्ये तूप घालून तुपामध्ये खोबऱ्याचा किस घालून चांगले परतून घेणे. मग त्या खोबऱ्याचा किसमध्ये वेलची पूड, साखर, दूध घालून मिश्रण चांगले एकजीव करून घेणे. मिश्रण चांगले तयार झाले कि ते मिश्रण कोमट असताना लाडू वळून घेणे. लाडू वळून झाल्यानंतर त्यावर सजावटीसाठी लाडू वर बदाम लावणे. सुंदर आणि एकदम मऊ लाडू तयार खाण्यासाठी आहे.

हे ही वाचा:

गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत?

भाजपमध्ये प्रवेश करणार का प्रवेश? राजकीय चर्चांना अशोक चव्हाणांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version