Friday, June 28, 2024

Latest Posts

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

कुरकुरी भेंडी रेसिपी करायला आवडते पण त्यांची भेंडी ही अनेकदा मऊ पडते. अशावेळी या जबरदस्त टिप्स वापरून तुम्हीही कुरकुरी भेंडी करू शकतो. ही भेंडी चपातीबरोबरच नाही तर नुसती खायलाही चांगली लागते.

भेंडीची भाजी ही सर्वांच्याच घरात केली जाणारी भाजी आहे. पण अनेक जणांना भेंडीचा बुळबुळीतपणा आणि लिबलिबितपणा आवडत नाही. तर काही जणांना कुरकुरी भेंडी रेसिपी करायला आवडते पण त्यांची भेंडी ही अनेकदा मऊ पडते. अशावेळी या जबरदस्त टिप्स वापरून तुम्हीही कुरकुरी भेंडी करू शकतो. ही भेंडी चपातीबरोबरच नाही तर नुसती खायलाही चांगली लागते.

साहित्य:

  • भेंडी- १/२ किलो
  • बेसनचे पीठ- १/२ वाटी
  • तांदळाचे पीठ – १/२ वाटी
  • कॉर्नफ्लोरचे पीठ – १/४ वाटी
  • लाल तिखट- २ चमचे
  • हळद- -१/२ चमचा
  • लिंबाचा रस – ३ चमचे
  • चाट मसाला- १/४ चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल गरजेनुसार

कृती:

  • कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या. नंतर ती कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
  • भेंडी मधोमध उभी कापून घ्या. नंतर त्याचे बारीक चार भाग करा.
  • कापलेली भेंडी एका भांड्यात ठेवा. त्यात बेसनाचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोरचे पीठ, लाल तिखट हळद ,मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व एकजीव करून घ्या.
  • एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मिश्रण घालून तयार केलेली भेंडी सोडा.
  • भेंडीला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या.
  • भेंडी तळून एका ताटात काढून घ्या आणि त्यात वरून थोडा चाट मसाला भुरभुरा.

कुरकुरीत भेंडी करताना काही सोप्या व महत्वपूर्ण टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्हीही भेंडीची भाजी करताना पुढील काही टिप्स वापरून पाहा.

  • भेंडीच्या भाजीत म्युसिलेज नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे भाजी चिकट होते. हा पदार्थ भेंडीच्या बियांच्या निर्मितीसाठी मदत करतो. त्यामुळे भेंडी चिकट होते.
  • भेंडी धुतल्यानंतर १ ते २ तास सुकण्यासाठी ठेवा, असे केल्याने भेंडी चिकट होणार नाही.
  • भेंडीची भाजी करताना भेंडी धुतल्यानंतर ती लगेच कापू नये.
  • भेंडी कापल्यानंतर त्यात लिंबाचा रस लावून ठेवावा, अन्यथा त्यात २-३ आमसुले टाकावे. आंबट पदार्थ टाकल्याने भेंडीचा चिकटपणा कमी होण्यास मदत होते.
  • भेंडी कुरकुरीत करायची असेल तर ती योग्य पद्धतीने कापणेही महत्वाचे आहे. अत्यंत पातळ अथवा जाडी अशी भेंडी कापू नये. कुरकुरीत भेंडी करण्यासाठी नेहमी भेंडी उभी कापावी, यामुळे भेंडीत चिकटपणा राहत नाही.
  • भेंडी कुरकुरीत करण्यासाठी जेव्हा तुम्ही त्यात मीठ मिक्स करता तेव्हाच त्यात सर्व जिन्नस एकत्र करून तळावे. मात्र साधी भेंडीची भाजी करताना त्यात मीठ हे भाजी ७० टक्के शिजल्यानंतरच टाकावे. अगोदर मीठ टाकल्याने मिठाला पाणी सुटते आणि भाजी आणखीनच बिलबिलीत होते.

 

हे ही वाचा

Munjya च्या यशानंतर पुन्हा Horror चित्रपटाची जादू, Riteish Deshmukh दिसणार मुख्य भूमिकेत

 

Mansoon Session 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे, सभागृहात वाचून दाखवण्यात आली नावे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss