आंब्याची कुल्फी तर खूप आवडते पण बनवायची कशी?

आंब्याची कुल्फी तर खूप आवडते पण बनवायची कशी?

सध्या सगळीकडे उष्णतेचे तापमान वाढलं आहे. उन्हाळयात कुल्फी खायलासर्वांनाच खूप आवडते. आंब्याचा सिजन सर्वत्र सुरु झाला आहे. आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. मिठाई, लस्सी, सरबत इत्यादी पदार्थ आंब्यापासून बनवले जातात. पण कधी आंब्यापासून बनवलेली कुल्फी खाल्ली आहे का? ही कुल्फी बनवणं खूप सोपं आहे. ही कुल्फी तुम्ही घरीच बनवू शकता. चला तर जाणून घेऊयात आंब्याच्या कुल्फीची रेसिपी.

साहित्य –

कृती –

सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुऊन घ्या. आंबे धुऊन झाल्यावर त्याच्याआतील गर काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये ब्रेडचा सफेद भाग घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर आणि ब्रेडचा सफेद भाग टाका. त्यामध्ये रबडी, दूध टाकून बारीक पेस्ट करून घ्या. दोन ते तीन वेळा चांगली बारीक पेस्ट करा. जेणेकरून कुल्फी चांगली सेट झाली पाहिजे. कुल्फीच्या साच्यात आंब्याचे बारीक तुकडे करून टाका. त्याला अल्युमिनियम पेपर लावून त्याला चांगले झाकून घ्या. नंतर त्याला छोटे-छोटे छिद्र काढून त्यामध्ये आईस्क्रीमची स्टिक लावा. आईस्क्रीमला रात्रभर फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवून द्या. तयार आहे थंडगार मँगो कुल्फी.

Exit mobile version