spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Matar paneer थंडीच्या दिवसात बनवा चमचमीत मटार पनीर

Matar paneer : हिवाळ्याच्या दिवसात बाजारात हिरवे गार मटर देखील मिळतात. ते शरीरासाठी खूप उत्तम असते. तसेच लोकांना कच्चे मटर सेवन करायला खूप आवडतात. मटर हे गोड देखील लागतात. पण बहुतेक लोकांना माहित नसते की मटर आपल्या शरीरासाठी किती उत्तम आहे. मटरमध्ये आरोग्यादायी गुणधर्म आढळून येते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. पण मटर (Pea) जास्त प्रमाणात खाणे देखील चांगले नाही. कारण मटरमुळे (Pea)शरीरात गॅस तयार होतो. मटार पासून आपण वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतो. तसेच तुम्हाला मटार पनीर (Pea paneer) ही रेसिपी माहितच असेल पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळया प्रकारे मटार पनीर कश्या पद्धतीने बनवायची या बद्दल सांगणार आहोत. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून मटार पनीर (Pea paneer) ही रेसिपी (Recipe) सांगणार आहोत.

साहित्य :

मटार

पनीर

आलं-लसूण पेस्ट

धणे-जीरे पावडर अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

आमचूर पावडर

गव्हाचे पीठ (किंवा मैदा)

तेल – पाव वाटी

कोथिंबीर

 

कृती –

सर्व प्रथम गव्हाचे पीठ चांगले मळून घेणे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा देखील वापरू शकता.

मटार (Peas) चांगले वाफवून मॅश (Mash) करून घेणे.

त्यानंतर पनीर (paneer) चांगले किसून घेणे, पनीर (paneer) चांगले किसून झाल्यानंतर मटारमध्ये पनीर मीठ आलं लसणाची पेस्ट धणे जिरे पावडर आमचूर पावडर कोथिंबीर (Salt Ginger Garlic Paste Coriander Cumin Powder Amchur Powder Coriander) घालून घेणे. आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून घेणे.

नंतर तयार केलेल्या गव्हाच्या पिठाची किंवा मैदाच्या पिठाची पोळी लाटून घेणे आणि त्या मध्ये हे मिश्रण भरून घेणे. पोळी मध्ये मिश्रण चांगले भरून झाल्यानंतर पोळी भाजून घेणे. आणि ही पोळी तुम्ही दही (curd) किंवा चटणी (chutney) सोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss