spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मेदू वडा तर नेहमीच खातो, पण बटाट्याचा कुरकुरीत वडा कधी खाल्ला आहे का?

बटाट्याचे वडे, बटाट्याची भजी आणि बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो. पण कधी बटाट्यापासून तयार केलेले मेदू वडे खाल्ले आहेत का? आज आपण बटाट्यापासून आगळीवेगळी चविष्ट रेसिपी पाहणार आहोत.

बटाट्याचे वडे, बटाट्याची भजी आणि बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो. पण कधी बटाट्यापासून तयार केलेले मेदू वडे खाल्ले आहेत का? आज आपण बटाट्यापासून आगळीवेगळी चविष्ट रेसिपी पाहणार आहोत. मेदू वडा म्हटला की आपल्याला साऊथ इंडियन पदार्थांची आठवण येते. पण आज बटाट्यापासून कुरकुरीत मेदू वडे कसे बनवायचे हे थोडक्यात पाहुयात.

बटाट्याच्या मेदू वड्यांसाठी लागणारे साहित्य:

  • बटाटे- ३ ते ४
  • लाल मिरची पावडर- १/२ टी स्पून
  • हिरवी मिरची- २ ते ३
  • मोहरी- १ टी स्पून
  • जिरे- १ टी स्पून
  • आलं-लसूण- १ टी स्पून
  • रवा- १ वाटी
  • तेल- आवश्यकतेनुसार
  • मीठ- चवीनुसार
  • पाणी- आवश्यकतेनुसार

कृती:

सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घ्या आणि साल काढून त्याला किसणीने किसून घ्या. नंतर एका कढईमध्ये १ चमचा तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, बारीक केलेली हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट टाकून मिक्स करून हे साहित्य भाजून घ्या. यानंतर त्यात थोडे पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला. पाणी गरम झाले की त्यात किसलेला बटाटा आणि रवा घाला. त्यानंतर कढईवर ५ ते ६ मिनिटांसाठी झाकण ठेवा. नंतर त्यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

यानंतर तयार झालेले मिश्रण एका मोठया बाऊलमध्ये काढून घ्या आणि हाताला पाणी किंवा तेल लावून त्याचे मेदू वड्याच्या आकारासारखे गोळे तयार करा. हाताला तेल किंवा पाणी लावल्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही. कढईत एका बाजूला तेल गरम करून त्यात एक-एक करून वडे तळून घ्या. एका प्लेटमध्ये तयार केलेले मेदू वडे काढून घ्या. बटाट्याचे कुरकुरीत मेदू वडे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहेत.

हे ही वाचा:

पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आमदाराची राणेंशी चर्चा

Manoj Jarange Patil यांनी केले उपोषण स्थगित; पुन्हा १३ ऑगस्ट पर्यंतचा सरकारला दिला अल्टिमेटम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss