Navartari Fast Special Recipe : उपवासासाठी बनवा स्वादिष्ट बटाट्याची कोशिंबीर

नवरात्रीच्या कालावधीत काही जण घट बसताना आणि घट उठताना असे दोन दिवस किंवा नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात.

Navartari Fast Special Recipe : उपवासासाठी बनवा स्वादिष्ट बटाट्याची कोशिंबीर

Navartari Fast Special Recipe : नवरात्रीच्या कालावधीत काही जण घट बसताना आणि घट उठताना असे दोन दिवस किंवा नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. उपवासाला काही जण फळे, दूध, ताक, खजूर यांसारखे पदार्थ खातात, पण उपवासात दिवसभर उत्साही राहण्यासाठी तसे पदार्थही खाणे आवश्यक आहे. उपवासाच्या पदार्थमध्ये बटाटयाच्या आवर्जून वापर हा केला जातो. बटाटा पासून अनेक पदार्थ हे बनवले जातात. अश्यातच बटाट्यापासून तयार होणारा अजून एक सदाबहार पदार्थ म्हणजे बटाट्याची कोशिंबीर… ही कोशिंबीर तुम्ही ही नेहमीची म्हणजे बिना उपवासाची करू शकता किंवा उपवासाला हवी असेल तर तुप जीरे यांची फोडणी देऊनही करु शकता ..चला तर मग अत्यंत झटपट आणि स्वादिष्ट अशा रेसिपी कडे आपण जाऊया..

साहित्य

२ मोठे बटाटे उकडून
१/२ कप अदमुरं दही
१ टेबल स्पून ओलं खोबरं
मीठ चवीनुसार
१ टीस्पून साखर
४-५ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
५-६ कढीपत्त्याची पाने
२ टेबलस्पून तेल
फोडणीकरता मोहरी जीरे हिंग
कुकिंग सूचना

कृती –

सर्वात प्रथम बटाटे स्वच्छ धुवा आणि उकडून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. आता एका वाडग्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी दही मीठ साखर शेंगदाणा कुट ओलं खोबरं कोथिंबीर घालून व्यवस्थित एकजीव करा

आता एका कढल्यामध्ये तेल तापत ठेवा तेल तापले की त्यात मोहरी आणि जीरे घाला मोहरी आणि जीरे चांगले तडतडले की त्यामध्ये हिंग घाला नंतर कडीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे थोडी कोथिंबीर घालून खमंग फोडणी करून घ्या आणि ही फोडणी बटाट्याच्या कोशिंबिरी वर घाला नंतर ही बटाट्याची कोशिंबीर किंवा राहते व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्हाला जर कोशिंबीर कोरडी वाटत असेल तर अजून त्यामध्ये दही घालून व्यवस्थित मिक्स करा.

तयार झाली आपली खमंग स्वादिष्ट बटाट्याची कोशिंबीर किंवा बटाट्याचे रायते. एका डिश मध्ये बटाट्याची कोशींबीर  सर्व्ह करा.

हे ही वाचा:

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

Gautami Patil चा नादच खुळा!, थेट लग्नाच्या वाढदिवसाला नाच-गाण्याचा कार्यक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version