Navratri 2024 : गरबा खेळताना थकवा येऊ नये म्हणून खाण्या – पिण्यात घ्या हे पदार्थ..;

Navratri 2024 : गरबा खेळताना थकवा येऊ नये म्हणून खाण्या – पिण्यात घ्या हे पदार्थ..;

Navratri 2024 : भारतातील प्रमुख सणांपैकी नवरात्री हा महत्त्वाचा सण आहे. नवरात्रीमध्ये गरबा खेळला जातो गरबा हे एक पारंपरिक नृत्य आहे. नवरात्रीमध्ये हे नृत्य करण्यासाठी सर्व वयोगटातील व्यक्ती नेहमीच तयार असतात. गुजरातमध्ये ती परंपरा असली तरी काही ठिकाणी ते एक फॅशन बनली आहे. नवरात्रीच्या कालावधीमध्ये देशभर गरब्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्रीमधील गरब्याची प्रथा जुनी असल्याचे मानले जाते जे एके काळी लिकनृत्य होते. जर तुम्हीही या वर्षी नवरात्री मध्ये गरबा नाईट ला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स आहेत. गरबा अनेक तास केला जातो. खरंतर गरब्याची गाणी ऐकूनच अनेक लोकांच्या शरीरात एनर्जी येते पण काही जणांना मात्र सतत एनर्जी ड्रिंकची गरज असते. या नवरात्रीमध्ये तुम्हालाही न थांबता गरबा करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी मदत करू शकतात.

फळे,ज्युस – गरबा खेळण्याआधी दिवसभरात फळे खाण्यास सुरुवात करू शकतात. फळे खाल्याने तुम्ही निरोगी राहतात. फळांमुळे आपण ऊर्जावान राहतो तसेच फळांच्या ज्युस पिल्यामुळे इंस्टंट रिफ्रेश मिळतो.

नारळपाणी – रात्री गरब्याला जाण्याआधी तुम्ही नारळपाण्याचे सेवन करा. नारळपाण्यामध्ये भरपूर पोषण असते ज्यामुळे तुम्हीची एनर्जी राहील. नारळपाण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते आणि तुम्हाला दीर्घकाळ फ्रेश राहण्यास मदत मिळते.

ड्रायफ्रूट्स – आपल्या सर्वाना माहित आहे की ड्रायफ्रूट्स किती फायदेशीर आहे. सुक्या मेव्यामध्ये आढळणारे पोषक घटक आपल्या शरीराला दीर्घकाळ एनर्जी देते त्यामुळे तुम्ही तुमच्या पर्स किंवा खिशामध्ये ड्रायफ्रूट्स ठेऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही ते केव्हाही खाऊ शकतात. तुम्हाला गरबा खेळण्यास एनर्जी मिळेल आणि तुम्हाला फ्रेश ठेवतील.

लिंबू पाणी – गरबा खेळण्यासाठी शरीर हायड्रेट असणे गरजेचं आहे. यामुळे तुम्ही गरबा खेळण्याआधी लिंबू पाण्याचे सेवन करू शकतात. या लिंबूपाण्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

Exit mobile version