उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक कैरीचे पन्हे

आता उन्हाळा सुरू झालाय तर मार्च पासून ते अगदी मी महिन्या पर्यंत बाजारामध्ये कैरी दिसत असतात. बाजारामध्ये मस्त-मस्त कैर्‍या यायला लागल्यात आहेत. आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा हंगामही सुरू होतो. विशेष म्हणजे कैरीपासून आपण घरातल्या घरात खूप काही खायला बनवू शकतो. जसे की , कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, कैरीचं मेथांबा , कैरीची आंबोशी, कैरीचा salad , कैरीचे पन्हे वगैरे वगैरे

उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक कैरीचे पन्हे

आता उन्हाळा सुरू झालाय तर मार्च पासून ते अगदी मी महिन्या पर्यंत बाजारामध्ये कैरी दिसत असतात. बाजारामध्ये मस्त-मस्त कैर्‍या यायला लागल्यात आहेत. आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा हंगामही सुरू होतो. विशेष म्हणजे कैरीपासून आपण घरातल्या घरात खूप काही खायला बनवू शकतो. जसे की , कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, कैरीचं मेथांबा , कैरीची आंबोशी, कैरीचा salad , कैरीचे पन्हे वगैरे वगैरे. कैरीच्या सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे कैरीचे पन्हे. उन्हाळा आला रे आला की, कैरीचे पन्हे हे बनवलेच जाते.आणि हे कैरीचे पन्हं बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. दर उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह बनवण्याची पद्धत आहे . कैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. आणि हे पन्हे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करते. तसेच आपल्या कडे उन्हातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आपण थंडगार पन्हे देऊन करू शकतो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी चैत्रातल्या हळदी कुंकवाच्या दिवशी सवाशिणींना हळदी – कुंकू लावून त्यांची ओटी भरली जाते. आणि त्या ओटीमध्ये त्यांना हरभरे देऊन थंडगार कैरीचे पन्हे प्यायला देतात. तर असो, आम्ही तुम्हाला कैरीचे थंडगार पन्हे कसे बनवायाचे याविषयी माहिती सांगणार आहोत.

कैरीचे पन्हे बनवण्याचे साहित्य :

कैरी किंवा कैऱ्या : ५ (मध्यम आकाराचे)
पुदिन्याची ताजी पाने : १/३ कप (धुवून घ्या)
जिरे पावडर : १ चमचा (जिरे भाजून घेतलेले )
बर्फाचे तुकडे : (आवश्यकतेनुसार)
वेलची पावडर : १ चमचा (वेलची भाजून घेतलेली)
साखर : २०० ग्रॅम
काळे मीठ : १ चमचा
पांढरे मीठ : चवीनुसार

थंडगार कैरीचे पन्हे बनवण्याची पद्धत :

कैरीचे पन्हे बनवण्यासाठी सर्वप्रथम कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या कैरी कुकरमध्ये ठेवा. त्यात एक ग्लास पाणी घाला आणि कुकरची एक शिट्टी होऊ द्या.आणि नंतर कुकरची वाफ गेल्यावर कुकर प्रेशर खाली उतरवून ते उघडा आणि एका प्लेटमध्ये कैऱ्या काढून घ्यावी. आणि त्यामध्ये जमलेले पाणी गाळून बाजूला ठेवावे. त्यानंतर कैरी थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घायची आणि हाताने दापून त्याचाकैरीचा गर काढायाचा. मग पूर्ण गर काढून घेतल्यानंतरकैरीची कोय बाजूला ठेवावी . त्यानंतर एक मिक्सर जार घ्या. त्यात प्रेशर कुकर मधला बाजूला काढून ठेवलेला शिजवलेल्या कच्या कैरीचा गर घाला आणि त्यामध्ये भाजलेली जिरे पूड, काळे मीठ, पांढरे मीठ, साखर, भाजलेल्या वेलचीचा पूड आणि पुदिन्याची पाने घाला. त्यानंतर या मध्ये 4 ते 5 बर्फाचे तुकडे घाला आणि ज्या पाण्यात आंबे उकळले ते पाणी घालून बारीक वाटून घ्या. मग तुमच्या गरजेनुसार थंड पाणी घालून ढवळा आणि चांगले मिक्स झाले की तुम्ही गाळून सर्व्ह (serv) करू शकता. यामुळे त्याला उत्तम चव येते.

हे ही वाचा : 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्रोने जोडणार

पंकजा मुंडे यांनी सांगितला त्यांच्या नावाचा किस्सा

१३ वर्षांनी मोठ्या असलेल्या “या”अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती रश्मिका मंदाना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version