आरोग्यासाठी ओवा खाण्याचे फायदे जाणून घ्या…

आरोग्यासाठी ओवा खाण्याचे फायदे जाणून घ्या…

नियमितपणे ओव्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच आरोग्यासाठी ओवा खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर त्याची पाने देखील फायदेशीर आहे. तसेच ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. बहुतेक लोक ओव्याचा वापर औषध म्हणून करतात. आयुर्वेदानुसार ओव्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. ओवा हा खूप उष्ण असतो. त्यामुळे बहुतेक लोक हिवाळयात ओव्याचे सेवन करतात. तर आज आम्ही तुम्हाला ओवा खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

ओवा हा मसाल्याचा पदार्थ आहे. ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तसेच ओवा चवीला तिखट आणि कडवट लागतो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम,
पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असे पोषक घटक असतात. त्याचबरोबर ओव्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स यांचा देखील समावेश असतो. तुम्ही ओव्याचा नैसर्गिक औषध म्हणून देखील वापर करू शकता. तसेच ओव्याचे पीक महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणी ओव्याचे पिक घेतले जाते.

ओव्याचा वापर रोजच्या आहारामध्ये देखील केला जातो. तसेच तुम्ही भाजी मध्ये किंवा वडेच्या पीठामध्ये देखील तुम्ही ओव्याचा वापर करू शकता. काही लोक ओव्याचे सेवन करत नाही. कारण ओवा चवीसाठी तिखट आणि कडवट लागतो. पण जर तुम्ही भाजी, किंवा वडे बनवताना वापरला तर तुम्हाला ओवा कडवट आणि तिखट लागणार नाही. आणि अन्न पचनास देखील मदत होईल.

 

पोट दुखणे, छातीत कफ जमा होणे, सर्दी, अश्या लक्षणांवर ओवा खूप फायदेशीर आहे.

जर तुम्हाला पोट दुखी ही समस्या होत असेल तर तुम्ही ओवा नुसता चावून खाऊ शकता. ओवा खाल्यानंतर कोमट गरम पाणीचे सेवन करणे. त्यामुळे पोट दुखी लगेच थांबेल.

जर तुम्हाला शौचास त्रास होत असेल किंवा पोट फुगीची समस्या असेल तर तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता.

पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही ओव्या सोबत बडीशेपचे सेवन करू शकता.

काही वेळा दुधाचे सेवन केल्याने ते कधी कधी दूध पचायला देखील त्रास होतो. तर तुम्ही दूध सेवन केल्यानंतर ओव्याचे सेवन करू शकता.

हे ही वाचा : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा हे उपाय…

 

 

Exit mobile version