लहानमुलांसाठी स्पेशल चहा सोबत बटाटे चिप्स

लहानमुलांसाठी स्पेशल चहा सोबत बटाटे चिप्स

लहान मुलांना पॅकेटमध्ये असणारे चिप्स खायाला खूप आवडते . अनेक मुले एका दिवसात चिप्सची अनेक पॅकेट खातात. बटाटे चिप्स मध्ये कॅलरीज जास्त असते . ज्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह होतो. अनेकवेळा मोठी माणसे देखील भरपूर प्रमाणत बटाटे चिप्स खातात. घरातील लहान मुलांना आणि मोठ्यांना बटाट्याचे चिप्स खूप आवडत असतील तर ते कमी तेलात बनवून घरी बनवता येतात. तर आज आम्ही तुम्हाला बटाटेचे चिप्स कसे बनवायचे ते आज आम्ही दाखवणार आहोत . बटाटेमध्ये भरपूर प्रमाणत पोषक घटक असतात .

हे ही वाचा :  गव्हाच्या पिठापासून बनवा ३ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि करा सकाळचा नाश्ता स्पेशल

 

बटाटे चिप्स बनवण्याची रेसिपी –

 

 

बटाटे चिप्स बनवण्यासाठी साहित्य –

तीन ते चार मिडीयम काराचे बटाटे, मीठ,

बटाटे चिप्स बनवण्याची कृती –

बटाटा चिप्स बनवण्यासाठी प्रथम बटाटे धुवून घ्या. नंतर ते सोलून घ्या . सोललेले बटाटे पाण्यात भिजवा. यामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया थांबते.

नंतर हे सोललेले बटाटे सुरीच्या मदतीने गोल आकारामध्ये कापून घ्या . जर तुमच्याकडे स्लायसर असेल तर त्याची मदत घ्या आणि पातळ चिप्स कापून तयार करा.

आता सर्व कापलेले बटाटे खारट पाण्यात भिजत ठेवा . काही वेळाने बटाट्याचे सर्व तुकडे प्लेटमध्ये काढून घ्या आणि चांगले सुकून घ्या . सुकल्यानंतर बटाटे चिप्सवर मीठ घालून घ्या . कढईत तेल गरम करून बटाट्याचे तुकडे मंद आचेवर तळून घ्या. ते थोडे सोनेरी झाल्यावर गॅसची आंच वाढवून कुरकुरीत बनवा. नंतर हे सर्व तळलेले चिप्स स्टीलच्या चाळणीत काढून ठेवावे. जेणेकरून सर्व तेल फिल्टर होऊन चिप्स कुरकुरीत राहतील. अशा प्रकारे तयार आहे चहासोबत बटाटे चिप्स .

हे ही वाचा : 

हिवाळ्यात रताळी खाणे ठरते शरीरासाठी फायदेशीर

 

Exit mobile version