घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तयार करा बीटचा रायता

आरोग्यासाठी बीट (Beetroot ) खाणे फायदेशीर आहे.

घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तयार करा बीटचा रायता

आरोग्यासाठी बीट (Beetroot ) खाणे फायदेशीर आहे. रोजच्या आहारात बीट खाल्ल्याने शरीराला आणि त्वचेला अनेक फायदे होतात. बीटचा रंग लाल असल्यामुळे बीट खायला अनेकांना आवडते. बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन (Hemoglobin) योग्य प्रमाणात राहते. बीटमध्ये प्रथिने (protein) ,निरोगी चरबी, फोलेट (Folate), मॅग्नेशियम (magnesium), लोह, तांबे, फायबर (fiber) आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आहारात बीटचे सेवन करणे गरजेचे आहे. बीटचा समावेश आहारात केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.जर रोज रोज तुम्हाला नुसताच बीट खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही बीटचा रायता नक्की घरी बनवू शकता.

साहित्य:-

२ बीट ,१ वाटी दही , हिरव्या मिरच्या ४ , १ टीस्पून राई, कढीपत्ता, जिरं , तेल, मीठ, साखर

कृती:-

सर्वप्रथम बीटचा रायता बनवण्यासाठी बीट घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून ते बारीक किसून घ्या. नंतर एका मोठ्या बाऊल मध्ये एका वाटी दही घेऊन ते नीट फेटून घ्या. फेटलेल्या दहीमध्ये बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि बीट टाकून मिक्स करून घ्या.नंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून ते गरम करून घ्या. गरम तेलामध्ये तीळ, मोहरी आणि कढीपत्ता घालून तळून घ्या. ते थोडं थंड झाल्यानंतर त्यात दही आणि बीटच्या मिश्रणात घाला आणि मिक्स करा आणि वरून भाजलेली जिरे पूड, मीठ, साखर घालून मिक्स करून घ्या. तयार आहे बीटचा रायता

हे ही वाचा: 

शरद पवार यांच्या समर्थनात निवडणूक आयोगाच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ निदर्शने

आमचा श्वास… आमचा ध्यास…, ठाण्यातील कार्यकर्त्यांचा संघर्ष करण्याचा निर्धार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version