मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

मधुमेहाच्या रुग्णांसाठी घरीच तयार करा शुगर फ्री लाडू…

मधुमेह असल्यास त्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई असते. त्यामुळे त्या रुग्णांनी गोडाचे पदार्थ कमी खावी. सणासुदीच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांनी शुगर फ्री पदार्थ सेवन करावे. त्यासाठी तुम्ही शुगर फ्री पदार्थ घरच्या घरी वेगवेगळया पद्धतीने बनवू शकता. आणि त्याचे सेवन करू शकता. घरातल्याच्या काही पदार्थांपासून आपण काही शुगर फ्री पदार्थ बनवू शकतो. जाणून घेऊया घरच्या घरी शुगर फ्री लाडू कश्या पद्धतीने बनवायचे.

हे ही वाचा:  तुरीच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे…

 

मधुमेहाच्या रुग्णांनी गोड आणि बऱ्याच पदार्थ पासून लांब राहणे गरजेचे आहे. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास मधुमेह जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुगणांनी आरोग्याची फार काळजी घेतली पाहिजे. कारण वेळेवर जेवण न झाल्यास, वजन नियंत्रित न ठेवल्यास अनेक आजार उद्भवता. मधुमेहाचा धोका देखील जास्त प्रमाणत वाढतो.

कृती –

(१) वाटी बारीक चिरून घेतलेले बदाम

(१ ) वाटी बारीक चिरून घेतेलेले काजू

(१ ) वाटी बारीक चिरून घेतेलेले आक्रोड

(१ ) वाटी पिस्ता

(१००) ग्राम किशमिश

(१००) ग्राम खजूर

(३) मोठे चमचे तूप

गुलाबाचे पाकळ्या

(१ ) मोठा चमचा इलायची पावडर

(१ ) ग्लास पाणी

केसर

 

साहित्य –

सर्वप्रथम एका बाउलमध्ये काजू, बदाम, पिस्ता, आक्रोट मिक्स करून घेणे. त्यानंतर कढईमध्ये तूप घालून घेणे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफूट घालणे. आणि चांगले भाजून घेणे. भाजून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेणे.

कढाईत १ ग्लास पाणी घाला, पाणी गरम झाल्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्या.

खजूर आणि किशमिशची बारीक करून घेतलेली पेस्ट घालून घ्या. हे मिश्रण चांगले ढवळून घ्या.

मिश्रणातूनच या लाडूला गोडवा येणार आहे. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात भाजून घेतेलेले मिश्रण मिक्स करून घ्या.

हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात केसर आणि वेलची पावडर घालून घ्या

हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा.

हे मिश्रण थंड झाल्यावर हातांना तूप लावून घ्या आणि लाडू वळवून घ्या.

 

हे ही वाचा:  

आदित्य ठाकरेंनी घेतला नारायण राणेंच्या वक्तव्याचा समाचार; मंत्रीपदाचा किमान …

 

Exit mobile version