खास उपवासासाठी राजगिऱ्याची पुरी आणि बटाट्याची भाजी, बनवा अगदी सोप्या पद्धतीत

खास उपवासासाठी राजगिऱ्याची पुरी आणि बटाट्याची भाजी, बनवा अगदी सोप्या पद्धतीत

राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम प्रमाण अधिक असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात. राजगिरा ग्लुटेन फ्री आहे. त्यामध्ये फायबर असल्यानं वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरते. राजगिऱ्याचा फक्त उपवासातच नाही तर रोजच्या आहारातही समावेश करावा . कारण राजगिरा हा अत्यंत गुणकारी आहे. राजगिऱ्याच्या सेवनामुळे शरीराला उष्णता मिळते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये याचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते. बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी राजगिऱ्याचा वापर केला जातो. राजगिऱ्यापासून धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा असे पदार्थही तयार करता येतात.

राजगिरीची पुरी –

साहित्य – राजगिरीचे पिठ , कोमट गरम पाणी , तेल , मीठ चवीनुसार.

कृती – सर्व प्रथम बाऊल घेणे आणि त्यामध्ये राजगिरीचे पिठ , कोमट गरम पाणी , तेल , मीठ घालून घेणे आणि कणिक मळून घेणे आणि पिठाचे गोळे तयार करुन घेणे मग गोल आकारात लाटून आणि तळून घेणे.

हेही वाचा : 

‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’, आशिष शेलार यांची जोरदार टीका

बटाट्याची भाजी –

साहित्य – 4 बटाटे उकडून घेणे, जिरे, कडीपत्ता, मिरची, शेंगदाण्याचा कूट, साखर, मीठ चवीनुसार , तेल

कृती – सर्व प्रथम कढई मध्ये तेल गरम करून घेणे आणि त्यामध्ये जिरे , मिरची, कडीपत्ता, घालून चांगले परतून घेणे परतून झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालून परत एकदा परतून घेणे. सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये बटाटे घालणे आणि त्यामध्ये वरून शेंगदाण्याचा कूट, मीठ घालून एकजीव करून घेणे आणि गरमागरम उपवासाठी पुरी भाजी तयार आहे.

भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात ; नाना पटोले

Exit mobile version