spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ramadan 2023, ईदसाठी बनवा Sheer Khurma

रमजानच्या शेवटच्या रात्री चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईदचा सण साजरा केला जातो. मुस्लिम समाजाचा हा मोठा आणि विशेष सण आहे.

रमजानच्या शेवटच्या रात्री चंद्र दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईदचा सण साजरा केला जातो. मुस्लिम समाजाचा हा मोठा आणि विशेष सण आहे. लोक ईदची तयारी महिनाभर आधीच सुरू करतात. या दिवशी स्वादिष्ट पदार्थ खाण्याबरोबरच लोकांच्या घरी मिठाई देखील बनवली जाते. ईदसाठी खास शीर खुरमा बनवतात .चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

शीर खुर्मा म्हणजे काय?

शीर खुर्मा ही एक प्रकारची सांजा आणि दूध किंवा मलईपासून बनविलेले एक पारंपारिक भारतीय मिष्टान्न आहे. हे बऱ्याचदा पिस्ता नट्स आणि ताज्या ब्लूबेरीसह दिले जाते.

शीर खुर्मा शेवया बनवण्यासाठी साहित्य –

  • शेवया – २०० ग्राम
  • दूध – २ लिटर
  • साखर – २ कप
  • केशर – चिमूटभर
  • वेलची – ५-६
  • काजू – १०
  • पिस्ता – १०
  • बदाम – १०
  • तूप – ३ चमचे

शीर खुर्मा बनवण्याची पद्धत –

शीर खुर्मा बनवण्यासाठी सर्वात प्रथम नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यात तूप घाला. त्यानंतर मध्यम आचेवर तूप गरम करून घ्या. तूप वितळल्यावर त्यात शेवया घाला आणि चमच्या चा मदतीने पूर्ण ढवळून घ्या. या शेवया भाजताना गॅस मंद आचेवर ठेवावा. नाही तर शेवया करपू देखील शकतात. या शेवया हलक्या तपकिरी रंगाच्या होईपर्यंत गरम करा. त्यानंतर त्या शेवया एका भाड्यात काढून घ्या.

आता आणखी एक दुसरा टोप (पातेले किंवा भांडे) घ्या. ते मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. काही वेळाने दुधाला पहिली उकळी आल्यावर त्यात केशर आणि वेलची घालून चांगले मिक्स करावे. यानंतर दूध अर्धे होईपर्यंत उकळत रहा. आता दुधात चवीनुसार साखर घाला. या दरम्यान, दूध हे ढवळत राहा. जेणेकरून दूध भांड्याच्या तळाला चिकटणार नाही.

दूध गरम करत असताना काजू, बदाम आणि पिस्ता घ्या आणि त्यांचे बारीक तुकडे करा. दूध तयार झाल्यावर त्यात शेवया आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाका आणि साधारण ५ मिनिटे शिजून द्या. यानंतर गॅस बंद करा. जर तुम्हाला खूप थंड शीर खुर्मा खायला आवडत असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर ड्रायफ्रुट्स सजवा आणि सर्व्ह करा.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss