उपवासाला साबुदाणा खिचडी, वडे खाऊन कंटाळा आलाय? तर साबुदाणा भजी नक्की करा ट्राय

आपल्या महाराष्ट्रात अनेक धर्म जातीचे लोक हे राहत असतात. त्याचबरोबर मराठी नागरिकांचे अनेक उपवास देखील असतात. काही ठिकाणी तर आठवड्याचे ३-४ दिवस देखील उपवास हे केले जातात.

उपवासाला साबुदाणा खिचडी, वडे खाऊन कंटाळा आलाय? तर साबुदाणा भजी नक्की करा ट्राय

आपल्या महाराष्ट्रात अनेक धर्म जातीचे लोक हे राहत असतात. त्याचबरोबर मराठी नागरिकांचे अनेक उपवास देखील असतात. काही ठिकाणी तर आठवड्याचे ३-४ दिवस देखील उपवास हे केले जातात. मग अश्या वेळी नेहमी साबुदाणा खिचडी, वडे , वरीचा भात असे तेच तेच पदार्थ खाऊन तुम्ही देखील नक्कीच कंटाळत असाल. मग अश्या वेळी काय करावे असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडत असेल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. यावेळेस उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदाणाची भजी नक्की बनवून बघा.

साहित्य :

साबुदाण्याची भजी बनवण्याची कृती :

आता उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचिडी किंवा वडे पेक्षा हि भाजी देखील नक्की ट्राय करा. यासाठी सर्वात प्रथम तुम्ही साबुदाणा हा स्वच्छ धुवून घ्या. जेणेकरून साबुदाणा वरील सर्व पावडर ही व्यवस्थित निघून जाईल. नंतर ते सर्व साबुदाणा नीट पुसून घ्या. त्यानंतर एक कढई घ्या आणि ती गॅसवर ठेवा. त्यामध्ये साबुदाणा घालून तो व्यवस्थित ५ मिनिट मंद आचेवर परतून घ्या.

त्यानंतर साबुदाणा निधीमधून काढून घ्या आणि त्याला नीट थंड करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडी जाडसर राहील अश्या पद्धतींने त्याला त्याला वाटून घ्या. आणि ती साबुदाणा पावडर व्यस्थित बाजूला काढून ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात २ कच्चे बटाटे कापून घ्या आणि नीट वाटून घ्या. त्यात १ वाटी पाणी आणि ३-४ हिरव्या मिरच्या घालून नीट सर्व मिश्रण वाटून घ्या. या मिश्रणात साबुदाण्याची पावडर घालून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करा. आता हे सर्व एकजीव झालेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आणि सुमारे १० मिनिटे एकजीव होण्यासाठी ठेवून द्या. म्हणजे १० मिनिटानंतर हे सर्व मिश्रण थोडे घट्ट होईल. मग त्यात अजून थोडेसे पाणी घालून मऊसूत भज्यांसाठीचे मिश्रण तयार करा.

हे मिश्रण तयार झाल्या नंतर तुमच्या घरी उपवासासाठी जे पदार्थ खाल्ले जातात ते देखील तुम्ही यात वापरू शकता. म्हणजेच काही लोक उपवासासाठी कोथिंबीर, काळी मिरीपूड, सैंधव मीठ, कोथिंबीर… तसेच या मिश्रणात तुम्ही शेंगदाणे देखील वाटून वापरू शकतात. नंतर सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून भजी टाळून घ्या. कुरकुरीत होई पर्यंत ही भजी नीट टाळून घ्या. म्हणजे घेण्यास आणखी जास्त स्वादिष्ट लागतील.

हे ही वाचा : 

Side effects of frozen foods फ्रोझन फूड हे आरोग्याचे शत्रू, जाणून घ्या काय आहेत घटक परिणाम

Vegan food वेगन पदार्थ म्हणजे काय ? जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version