Thursday, June 27, 2024

Latest Posts

Saltiness in food जेवणातील खारटपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मीठ (Salt) हे रोजच्या आहारामध्ये वापरले जाते. पण जेवणाला मिठाशिवाय चव येत नाही. मीठ आरोग्यासाठी चांगले जरी असेल तरी तेवढे ते नुकसानकारक देखील आहे. मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात (Consuming too much salt has harmful effects on health). मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाची चव वाढवते किंवा बिघडवूही शकते. काहीवेळा आपण अन्न शिजवताना चुकून जास्त मीठ घालतो, जे अन्नाची संपूर्ण चव खराब करते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून जेवणातील खारटपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

भाजी किंवा वरणात मीठ जास्त असल्यास त्यात उकडलेले बटाटे (Boiled potatoes) घालून मीठ कमी करता येते. बटाटे भाजी किंवा डाळीमध्ये असलेले अतिरिक्त मीठ शोषून (Absorbing salt) घेतील आणि त्यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल.

जर जेवणात मीठ जास्त असेल तर आपण लिंबू देखील वापरू शकता. भाजी किंवा डाळीत लिंबाचा रस (Lemon juice in dal) घालून मिक्स करा. असे केल्याने मीठ कमी होईल आणि जेवणाची चव खराब होणार नाही.

 

जेवणात मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये तुम्ही १ चमचा दही (curd) घालू शकता, अन्नात दही टाकल्यास ५ मिनिटे तरी अन्न शिजवून घ्या. यामुळे अन्न खराब होत नाही आणि जेवणातला खारटपणा (Saltiness in food) देखील कमी होतो.

अन्नात मीठ जास्त झाले असेल तर तुम्ही त्यामध्ये फ्रेश क्रीम (Fresh cream) देखील वापरू शकता यामुळे जेवणातील मीठ (Salt) कमी होण्यास मदत होते. आणि अन्न चवदार लागते. भाजीत मीठ जास्त असल्यास ब्रेडचाही वापर करू शकता. यासाठी भाजीमध्ये ब्रेडचे (Bread) १-२ स्लाईस टाका आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. या मुळे अन्नात जास्त पडलेले मीठ (Salt) कमी होईल.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss