Shardiya Navratri 2024: यंदाच्या नवरात्रीनिमित्त बनवा खास उपवासाचा बटाटेवडा रेसिपी…

उपवासाच्या या फराळामध्ये आपण सहसा साबुदाण्याची खिचडी, खीर, उपवासाचे थालीपीठ, बटाट्याची सुकी भाजी असे अनेक पदार्थ केले जातात. पण आज आपण बटाट्यापासून बटाटेवडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी बघूया.

Shardiya Navratri 2024: यंदाच्या नवरात्रीनिमित्त बनवा खास उपवासाचा बटाटेवडा रेसिपी…

यंदा शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. आपल्याकडे उपवासाला एक प्रकारचे धार्मिक महत्व आहे. उपवासाच्या दिवशी आपल्याकडे खास फराळ तयार केला जातो. उपवासाच्या या फराळामध्ये आपण सहसा साबुदाण्याची खिचडी, खीर, उपवासाचे थालीपीठ, बटाट्याची सुकी भाजी असे अनेक पदार्थ केले जातात. पण आज आपण बटाट्यापासून बटाटेवडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी बघूया. उपवासाचा बटाटेवडा हा उपवासात खाण्यासाठी उत्तम व चविष्ट पर्याय आहे.

साहित्य:

बटाट्याच्या सारणासाठी:

बाहेरील आवरणासाठी:

कृती:

बटाट्याचं सारण तयार करण्यासाठी:

१. प्रथम बटाटे उकडून सोलून घ्या आणि त्यांना चांगले मॅश करा.

२. कढईत तूप गरम करून त्यात जिरे घाला आणि ते तडतडल्यावर हिरव्या मिरच्या घाला.

३. त्यात शेंगदाण्याचं कूट, सैंधव मीठ, आणि मॅश केलेले बटाटे घालून चांगले परता.

४. या मिश्रणात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा.

५. सारण थंड होऊ द्या आणि त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करा.

बाहेरील आवरण तयार करण्यासाठी:

१. राजगिऱ्याचं पीठ, सैंधव मीठ एकत्र करून त्यात पाणी घालून घट्ट पिठलं तयार करा.

२. पिठाचं मिश्रण खूप पातळ नसावं, ते थोडं घट्ट हवं जेणेकरून त्यात बटाट्याचे गोळे व्यवस्थित मुरतील.

बटाटेवडे तळण्यासाठी:

१. एका कढईत तेल गरम करा.

२. तयार केलेले बटाट्याचे गोळे पीठात बुडवून गरम तेलात तळा.

३. बटाटेवडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

४. तळलेले वडे काढून पेपर टॉवेलवर ठेवा, जेणेकरून जास्तीचं तेल निघून जाईल.

५.गरमागरम उपवासाचे बटाटेवडे नारळाची चटणी किंवा दह्यासोबत खावू शकता.

हे ही वाचा:

Flipkart Sale : iPhone 15 Pro आत्तापर्यंत सर्वात स्वस्त किमतीत उपलब्ध, ३०,००० रुपयांपर्यंत बचत…

कोण मारणार बाजी? Mumbai University Senate Election 2024 चा आज लागणार निकाल…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version