spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shravan Special, श्रावणी सोमवारी बनवा स्वादिष्ट बटाटा साबुदाणा पुरी

श्रावण महिना सुरु झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी अधिकमास असल्याने श्रावणातील सोमवारचे उपवासासही वाढले आहेत. उपवासाचे पदार्थ म्हटले की , तीच साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची उसळ आठवते.

श्रावण महिना सुरु झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी अधिकमास असल्याने श्रावणातील सोमवारचे उपवासासही वाढले आहेत. उपवासाचे पदार्थ म्हटले की , तीच साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची उसळ आठवते. पण तुम्ही या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काही तरी वेगळे आणि टेस्टी नक्कीच बनवू शकता. आपल्याकडे पुरी भाजी हा पदार्थ अनेकजण आवडीने खातात. हाच पदार्थ तुम्हाला उपवासाला खाता आला तर..? होय, आज हीच उपवासाची पुरी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. मुख्यतः पुरी गव्हाच्या पिठापासून बनवली जाते मात्र ही उपवासाची पुरी आपण साबुदाणा आणि बटाट्यापासून बनवणार आहोत. ही पुरी तुम्ही बटाट्याच्या उसळीसोबत खाऊ शकता. जाणून घेऊयात साहित्य आणि कृती.

साहित्य –

२ मोठे उकडलेले बटाटे (boiled potatoes)
१/२ कप साबुदाणा (sago)
५ मिरच्या (chilies)
१/४ कप चिरलेली कोथिंबीर (chopped coriander)
१/२ टिस्पून जिरे (cumin seeds)
३ टेस्पून शेंगदाणा कूट (Peanut Code)
१ टिस्पून जिरेपूड (cumin powder)
२ टेस्पून शिंगाडा पिठ (corn flour)
चवीपुरते मीठ (Salt)
तळण्यासाठी तेल ( Oil)

कृती

बटाटा साबुदाणा पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवून ठेवा. अधिकचे पाणी काढून टाका. नंतर किंचीत पाणी घाला. साबुदाण्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे. मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मीठ घालून सर्वकाही नीट बारीक करून घ्या. यावेळी यात पाणी घालू नका, मग शिजवलेले बटाटे किसून घ्या. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवा. त्यांनतर एक कढई घेऊन तेल तापत ठेवा. प्लास्टिकवर तेलाचा हात लावून प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापा आणि तेलात टाका आणि छान ब्राऊन रंग आल्यावर येईपर्यंत तळून घ्या. आता तुमची स्वादिष्ट उपवासाची बटाटा साबुदाणा पुरी तयार आहे. ही पुरी तुम्ही गरमागरम चटणीबरोबर खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Latest Posts

Don't Miss