spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उपवासाठी चमचमीत आणि स्वादिष्ट वरीची खिचडी

उद्या म्हणजेच दि. २६ सप्टेंबर पासून सर्वत्र नवरात्री हा सण मोठा उत्साहात साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात नवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात केला जातो. नवरात्रीमध्ये नऊ देवींची पूजा केली जाते. नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा लावला जातो. तसेच नऊ दिवस उपवास केले जातात. आणि भरपूर प्रमाणात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तसेच आरोग्यासाठी उपवास चांगला मानला जातो. उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी , फळे, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या पुऱ्या, दूध, यासारखे फळे तुम्ही सेवन करतात. तसेच हे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला वरीची खिचडी कशी बनवायची ती दाखवणार आहे.

हे ही वाचा : Navratri 2022: यंदाची घटस्थापना आहे दरवर्षीपेक्षा विशेष… घ्या जाणून शुभ मुहूर्त

 

रेसिपी –

 

वरीची खिचडी’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

वरी – वाटीभर

हिरव्या मिरच्या – तीन ते चार

तूप – दोन चमचे

जिरे

शेंगदाण्याचा कुट – अर्धी वाटी

गरम पाणी – आवश्यकेनुसार

मीठ – चवीनुसार

वरीची खिचडी’ बनवण्याची कृती –

सर्व प्रथम वरीची खिचडी’ बनवण्यासाठी सर्वात आधी वरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. त्यानंतर वरलीतले पाणी काढून घेणे. मग दुसरीकडे गॅसवर कढई तापायला ठेऊन त्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यानंतर त्यात जिरे घालावे. जिरे तडतडल्यानंतर त्यात मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यानंतर मिरच्या परतून झाल्या की त्यामध्ये वरी घालणे आणि वरी तुपामध्ये चांगली परतून घेणे. आणि वारंवार हलवावी वरी चांगली परतून झाल्यानंतर त्यात पाणी घालून घेणे. त्यानंतर पाण्याला उकळीआल्या नंतर त्यात शेंगदाण्याचं कुट आणि चवीनुसार मीठ घालावे. कढईतलं मिश्रण एकत्रित करून घेणे. त्यानंतर वरीच्या खिचडीवर झाकण ठेवणे आणि ती शिजायला ठेवणे खिचडी शिजून झाली की ती गरमागरम खाणे.

हे ही वाचा :

उपवासाठी टेस्टी डोसा खास तुमच्यासाठी

 

Latest Posts

Don't Miss