चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

आपल्या रोजच्या आहारामध्ये मेथीचा वापर केला जातो.

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

आपल्या रोजच्या आहारामध्ये मेथीचा वापर केला जातो. मेथी शरीरासाठी पौष्टिक आहे. मेथी पासून मेथीचे लाडू , मेथीची भाजी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तसेच मेथीपासून मेथीचा पराठा देखील बनवला जातो. मेथीचा पराठा हा सकाळच्या नाष्ट्यासाठी उत्तम पदार्थ आहे. तसेच मेथी ही काहीजणांना आवडत नाही पण जर मेथीपासून आपण वेगवगेळे पदार्थ बनवले तर लोक आवडीने खातात. तर आज आपण मेथीपासून पराठा कसा बनवायचा ही रेसिपी तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे.

हे ही वाचा : ‘ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो…’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन

 

रेसिपी –

 

साहित्य –

मेथी

लालतिखट

हळद

लसूण

मिरचीचा ठेचा

मीठ

धणेपूड

ओवा

पांढरे तीळ

चण्याच पीठ

गावाचं पीठ

कृती –

सर्व प्रथम बाउल मध्ये गावाचं पीठ, चण्याचं पीठ, लालतिखट, धणेपूड, पांढरे तीळ, लसूण, ओवा, मीठ, मिरचीचा ठेचा, हळद, मेथी घ्या आणि हे सर्व मिश्रण मिक्सकरून चांगले घट्ट पीठ मळून घा. त्यानंतर त्याचे गोळे तयार करून घेणे आणि गोल आकारामध्ये लाटून घेणे. लाटून झाल्यानंतर ते मस्त भाजून घ्या. मेथीचा पराठा तयार झाल्यानंतर तुम्ही लोणी तुपासोबत खाऊ शकता.

हे ही वाचा :

ग्रीन टी मुळे शरीरावर होतील दुष्पपरिणाम

 

Exit mobile version