मसालेदार चमचमीत ढाबा स्टाईल अंडी करी

अंडी खाल्याने शरीरावर खूप फायदे होतात.

मसालेदार चमचमीत ढाबा स्टाईल अंडी करी

अंडी खाल्याने शरीरावर खूप फायदे होतात. अंड्यामध्ये पौष्टिक घटक असतात. जे इतर पदार्थापासून सहज मिळत नाही. रोज नियमितपणे अंडी खाल्याने शरीर सुदृढ होते. तसेच रोगप्रतिकार शक्ती ही वाढते. प्रामुख्याने यातील कॅल्शिममुळे हाडांना बळकटी मिळते. लहान मुलांचा विकासासाठी अंडी हे उपयुक्त ठरते. तसेच अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए बी -६, बी १२ प्रथिने, लोह आणि क्षार मिळते. अंड्यातील या बहुगुणांमुळेच “संडे हो या मंडे रोज खाओ अंडे” असे देखील बोलले जाते. अंड्यापासून आपल्याला वेगवगेळे पदार्थ देखील बनवता येतील. तर चला आज जाणून घेऊया अंडी करी कशी बनवायची.

हे ही वाचा :आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा करण्याची पद्धत

 

रेसिपी –

साहित्य –

उकडलेली अंडी

तेल

लालतिखट

मीठ चवीनुसार

तेजपत्ता दालचिनी

लवंग

कांदा

टोमॅटो प्युरी

आलं आणि लसूणची पेस्ट

धणेपूड

कस्तुरी मेथी

पाणी

 

कृती –

सर्व प्रथम उकडलेली अंडी तेलात फ्राय करून घेणे. त्यानंतर कढईमध्ये सर्व प्रथम तेल घालून घेणे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता घालणे. आणि दालचिनी घालणे त्यानंतर कांदा घालणे आणि मस्त फ्राय करून घेणे. कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालणे मग आलं लसूण ची पेस्ट,
धणेपूड , कस्तुरी मेथी घालून ग्रेव्ही मस्त शिजून घेणे आणि त्यात थोडे पाणी घालणे मग ग्रेव्ही ढवळून घेणे चांगली ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेली अंडी घालून ग्रेव्ही चांगली शिजवून घेणे. आणि मस्तपैकी अंडी करी तयार आहे.

हे ही वाचा :

लहान मुलांचे पोट बिघडल्यास त्यांना अन्न पचन होणारे कोणते पदार्थ द्याल ?

 

Exit mobile version