spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जेवताना तोंडी लावायला घ्या.. Fresh Creamy Onion फ्लेवरच्या कांद्याच्या चकत्या

जेवण रुचकर लागावे म्हणून अनेक लोकांना जेवणात कांदा खायला खूप आवडतो. बऱ्याच लोकांना कांद्याशिवाय जेवण जात नाही. तसेच जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण पापड, लोणची, कुरडया, कोशिंबीर अश्या बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो.

जेवण रुचकर लागावे म्हणून अनेक लोकांना जेवणात कांदा खायला खूप आवडतो. बऱ्याच लोकांना कांद्याशिवाय जेवण जात नाही. तसेच जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण पापड, लोणची, कुरडया, कोशिंबीर अश्या बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. तरीही बऱ्याच मोठ्या मंडळींना कांदा खाल्याशिवाय चव लागत नाही. पण बऱ्याचदा आपण कांदा कच्चा कापून खातो किंवा कोशिंबीर मध्ये हि कांडा कच्चा घालतो पण या कांद्याला तुम्ही विविध रेसिपी बनवून देखील खाऊ शकता. कांद्याच्या विविध डिश आपण उत्तम प्रकारे बनवू शकतो हे आपल्याला माहिती नसते म्हणून चटपटीत किंवा क्रिमी फ्लेवर्ड चा कांदा कसा बनवायचा हि पद्धत आपण जाणून घेऊयात

साहित्य

  • १ टेबलस्पून मिरची पावडर
  • १ टेबलस्पून चाट मसाला
  • १ टेबल स्पून कोथिंबीर
  • ५-७ बर्फाचे खडे
  • १०-१२ कांद्याच्या चकत्या (गोल आकारांत कापून घेतलेल्या)
  • १ टेबलस्पून लिंबाचा रस
  • मीठ – चवीनुसार

पापकृती

  • सर्वात प्रथम एका भांड्यात आईस क्यूब (Ice cube) घ्या त्यात त्यात कांद्याच्या गोल चकत्या घालून काही काळासाठी कांदे भिजत ठेवा.
  • दुसऱ्या एका भांड्यात मिरची पावडर (Chilli powder), चाट मसाला (Chaat masala) , कोथिंबीर(Coriander), मीठ (salt )आणि लिंबाचा रस (Lemon juice)घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या.
  • एकत्रित मिश्रणात बर्फाच्या पाण्यात भिजत ठेवलेल्या कांद्याच्या चकत्या (Onion discs) घालाव्यात. तयार करून घेतलेल्या मिश्रणात कांद्याच्या चकत्या व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • नंतर हे गरम तेलात तळा अश्या प्रकारे तुमच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी फ्रेश क्रिमी ओनियन (Fresh Creamy Onion)म्हणजेच कांद्याच्या मसालेदार चकत्या तयार असतील. या तुम्ही न तळताही तश्याच खाऊ शकता.

हे ही वाचा:

अल्पवयीन व्यक्ती Pan Card साठी अर्ज कसा करणार ?

चविष्ट समोसा बनवा घरच्या घरी…

आयुर्वेदिक त्रिफळाचे औषधी फायदे घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss