उपवासाठी चविष्ट खमंग ढोकळा खास तुमच्यासाठी

उपवासाठी चविष्ट खमंग ढोकळा खास तुमच्यासाठी

तुम्हाला ढोकळा हा पदार्थ खूप आवडत असेल. तसेच गुजराती मध्ये ढोकळा हा पदार्थ खूप प्रसिद्द आहे. तसेच उपवासामध्ये काय खायचं हा नक्की प्रश्न पडला असेल. हा पदार्थ अगदी लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्येंत लोकांना आवडतो. ढोकळा या पदार्थाचे नाव काढल्यास जिभेला पाणी सुटे. तसेच ढोकळा हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतो. उपवासामध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी, ज्युस , वेफर्स , राजगिऱ्याची पुरी , हे सर्व पदार्थ खात असतात. आणि हे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा देखील आला असेल अशावेळी तुम्हाला चमचमीत पदार्थ खाऊशी वाटतो आणि तो नक्की काय बनवायचा हा विचार तुम्ही करत असतात. आज आम्ही तुम्हाला उपवासाठी टेस्टी आणि खास खमंग ढोकळा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. तर जाणून घ्या रेसिपी. हा पदार्थ नक्की तुम्हाला आवडेल.

हे ही वाचा : काकडी खाण्याचे फायदे

 

रेसिपी –

 

साहित्य –

१ कप वरई

साबुदाणा

अर्धा कप दही

आलं आणि मिरचीचा ठेचा

पाणी

पावचामचा खायचा सोडा

मीठ चावीपुरता

कुकरच भांड

तेल

कृती –

सर्व प्रथम वरई मिक्सर मध्ये वाटून घेणे. आणि त्यानंतर मिक्सर मध्ये थोडे साबुदाणे एकदम बारीक वाटून घेणे. त्यानंतर बाउल मध्ये वाटलेली वरई आणि बारीक वाटलेला साबुदाणा घालून घेणे त्यामध्ये अर्धा कप दही, आलं आणि मिरचीचा ठेचा , थोडे पाणी , पावचामचा खायचा सोडा , मीठ, हे सर्व मिश्रण एकत्र मिक्सकरून घट्ट करून घेणे. मिश्रण तयार झाल्यानंतर कुकरचे भांडे घेणे आणि त्या भांड्याला तेल लावून घेणे मग त्यामध्ये तयार केलेले मिश्रण घालून घेणे आणि ते भांड कुकरमध्ये ठेवणे आणि त्यानंतर कुकरचे झाकण लावणे आणि त्याची शिटी काडून घेणे आणि २० मिनिटे स्टीम करून घेणे. आणि गरमागरम ढोकळा तयार आहे. ढोकळा तयार झाल्यानंतर वाटी मध्ये तेल गरम करून घेणे आणि तेलामध्ये राई आणि कडीपत्ता चांगला गरम करून घेणे आणि ढोकळ्याचा वरून घालून घेणे.

हे ही वाचा :

दबंग स्टाईलमध्ये २ कांगारूंची हाणामारी ! व्हिडिओ होतोय तुफान वायरल

Exit mobile version