ओट्स खाण्याचे फायदे

लोक नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खाणे पसंत करतात. यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्स  आरोग्यासाठी खूप लाभदायक असते

ओट्स खाण्याचे फायदे

लोक नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खाणे पसंत करतात. यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्स  आरोग्यासाठी खूप लाभदायक असते, ज्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. ओट्स पोटासाठीदेखील चांगले असतात, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ओट्सच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे ओट्स वजन कमी करण्यासदेखील मदत करतात.

ओट्समुळे पोट साफ राहण्यास मदत होते ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारते. शिवाय ओट्समुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते आणि तुम्ही अपथ्यकारक पदार्थ कमी प्रमाणात खाता. याचा परिणाम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर होतो आणि तुमची पचनसंस्था चांगली कार्यरत राहते. ओट्स खाण्यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यादेखील कमी प्रमाणात होतात. यासाठीच ज्यांना पोटाच्या समस्या अथवा बद्धकोष्टतेचा त्रास असेल अशा लोकांनी आहारात ओट्सचे प्रमाण वाढवावे.

ओटस तुमच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. कारण ओट्सचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि तजेलदार होते. यासाठी ओट्स कच्चा दूधात भिजवून त्याची पेस्ट नियमित त्वचेला लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एकप्रकारचा नैसर्गिक ग्लो येईल. त्वचेवर सतत धुळ, माती, प्रदूषणचा थर बसत असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या आतील छिद्र बंद होतात. या समस्येमुळे पिंपल्स, त्वचेच्या समस्या, इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. मात्र जर तुम्ही ओट्स आणि मधाचा स्क्रब चेहऱ्यावर लावला. तर ओट्समधील फायबर्समुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होण्यास मदत होते.

ओटस त्वचेप्रमाणे केसांसाठीदेखील पोषक ठरते. ओट्सचा हेअर मास्क लावल्यामुळे स्काल्पला येणारी खाज कमी होते. एखाद्या तेलाप्रमाणे ओट्स केसांना मऊपणा देतात. केसांमध्ये कोंडा होणं, केस गळणे, केस कोरडे होणे, केस तुटणे यासारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही केसांवर ओट्सचा हेअर मास्क लावू शकता. शिवाय नियमित ओट्सचा वापर केसांवर केल्यामुळे केस गळणे तर कमी होतेच शिवाय केस मजबूत, लांब, मऊ आणि चमकदार होतात.

नियमित ओट्स खात असाल तर तुमची रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण ओटसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि बीटा ग्लुटेन असते. तुमच्या शरीराचा ग्लायकेमिक इंडेक्स नियंत्रित ठेवण्यासाठी हे घटक गरजेचे असतात. अती लठ्ठ आणि टाईप 2 मधुमहींसाठी तर ओट्स वरदान ठरतात. शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ओट्सचा वापर करणं खूप गरजेचं आहे.

Exit mobile version