spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कांदा मिरचीचं चटकदार लोणचं वाढवेल जेवणाची चव…

कांद्याच्या लोणच्याची चव अतिशय चटकदार होते. एखाद्या दिवशी जर भाजीला काही नसेल तर कांद्याचे लोणचे चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कांदा मिरचीचे लोणचे ही एक स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे.

ताटात वरण-भात, चपाती-भाजी असं सगळं जेवण असले तरी लोणचे, चटणी आणि कोशिंबीर अशा चटकदार पदार्थांशिवाय ताट पूर्ण झाले आहे असे वाटतच नाही. लोणच्याशिवाय जेवायला मजाच येत नाही असे म्हणणारेही अनेक लोणचे प्रेमी असतात. म्हणूनच आपण नेहमी कैरी आणि लिंबूचे लोणचे हे घरात ठेवतोच. काही जण ऋतुनुसार गाजर, मुळा बीट असे इतर लोणचेही करतात. आज आपण या लोणच्यासोबतच कांदा मिरचीचे लोणचं करून पाहुयात. कांद्याच्या लोणच्याची चव अतिशय चटकदार होते. एखाद्या दिवशी जर भाजीला काही नसेल तर कांद्याचे लोणचे चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कांदा मिरचीचे लोणचे ही एक स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग पाहूया कांदा मिरचीचे लोणचे बनवण्याची पूर्ण रेसिपी पाहूयात.

साहित्य:

  • २०-२५ लहान लाल कांदे (सांबर कांदे)
  • १०-१२ हिरव्या मिरच्या
  • १ टेबलस्पून मोहरी
  • १/२ टेबलस्पून मेथी दाणे
  • १/२ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून हिंग
  • २ टेबलस्पून लिंबाचा रस
  • १/२ कप तेल
  • चवीनुसार मीठ

कृती:

  • कांदे सोलून घ्या. मिरच्या स्वच्छ धुऊन, त्यांचे देठ काढून त्यांना मधून फोडा, पण पूर्णपणे न कापता, त्यांना दोन्ही बाजूंनी उघडा ठेवा.
  • मोहरी आणि मेथी दाणे तव्यावर थोडे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा.
  • एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, हळद आणि तयार केलेली मोहरी-मेथी पावडर घाला. हे सर्व मिश्रण चांगले परता.
  • या मिश्रणात कांदे आणि मिरच्या घाला. चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा. आता हे लोणचे मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा.
  • लोणचे थंड होऊ द्या आणि त्यानंतर बंद बाटलीत भरून ठेवा.
  • हे लोणचे तुम्ही जेवणासोबत किंवा पराठ्यांसोबत खाऊ शकता.
  • लोणचे काही दिवस चांगले राहते आणि याचा स्वाद दररोज वाढतो.
 
हे ही वाचा:

Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला लागलं गालबोट!, मुंबईत थरावरुन कोसळून तब्बल १५ गोविंदा जखमी…

रिलीजपूर्वीच ‘इमर्जन्सी’ सापडला वादात, चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss