आहारामध्ये ‘हे’ पेय उपयुक्त

आहारामध्ये ‘हे’ पेय उपयुक्त

दही किंवा ताक शरीरासाठी उपयुक्त आहे . शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक किंवा दही याचा उपयोग केला जातो . ताकामध्ये नैसर्गिक बॅक्टेरिया पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात. पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला ताकाचा अधीक लाभ होतो . ताकात विटामिन B 12 कैल्शियम, पोटेशियम सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटात दुखत असेल तर त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. स्त्रियांना मासिक पाळी मध्ये खूप वेदना होतात जर स्त्रियांनी आहार वेळेवर केला तर त्या वेदना भरून निगण्यास मदत होईल . ताकाला जीवनदान देणारे अमृत मानले जाते . ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.

हे ही वाचा : सफरचंद खाण्याचे फायदे

 

ताक पिण्याचे फायदे –

ताक पिल्याने पचनशक्ती सुधारते .

ताक पिणे पोटांच्या आजारावर उपयुक्त आहे .

ताक हे हाडांना मजबूत करते .

ताक पिल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते .

पित्त होत नाही .

ताक हे डोळे व केसांसाठी उपयुक्त आहे .

ताक पिल्याने शरीरामध्ये थंडावा राहतो .

रक्तदाब कमी होतो .

ताक पिल्याने प्रतिकारशक्ती चांगली राहते .

ताक त्वचेसाठी ही देखील उत्तम आहे .

ताक पिल्याने वजन नियंत्रण मध्ये राहते .

 

ताक कोणते प्यावे –

– ताक हे ताजे असावे आणि घरी लावलेल्या दहीचे असावे .

– दही आंबट जास्त नसावे .

– ताक हे जास्त घट्ट पण नसावे आणि जास्त पातळ पण नसावे .

– ताकामध्ये साखर घालू नये .

– सुंठ, मिरे , जिरे पूड ,पुदिना आणि रॉक सॉल्ट वापरुन ताक बनवले तर त्याची गुणवत्ता चांगली होते.

हे ही वाचा :

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

 

Exit mobile version