यंदाच्या नवरात्रीत बनवा पौष्टिक उपवासाच्या पुऱ्या, जाणून घ्या रेसिपी.

नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून, नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

यंदाच्या नवरात्रीत बनवा पौष्टिक उपवासाच्या पुऱ्या, जाणून घ्या रेसिपी.

Navratri २०२३:- नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून, नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. उत्सव काळात सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. तसेच नवरात्रीत विविध पदार्थ करून खाल्ले जातात , पण तेच तेच पदार्थ खाऊन काहींना कंटाळा येतो. जर तुम्हाला देखील नवरात्रीत उपवास ठेवायचा असेल आणि उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास पौष्टिक उपवासाच्या पुऱ्या, ज्या चवीस रुचकर तर आहेतच पण दिवसभर तुम्हाला ऊर्जा देखिल देतील.

उपवासाच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य:
१ उकडलेला बटाटा, अर्धी वाटी भगर, १ किंवा २ हिरव्या मिरच्या, १ चमचा काश्मिरी लाल तिखट, तेल, चवीनुसार मीठ, गरज पडल्यास पाणी.

 जाणून घेऊयात याबद्दलची रेसिपी:
एक उकडलेला बटाटा किसून घ्या, त्यानंतर अर्धी वाटी भगर मिक्सरमधून बारीक करा व त्याचं पीठ करा, या भगरीच्या पिठात किसलेला बटाटा मिक्स करा,त्यानंतर हिरवी मिरची ठेचा आणि ती ठेचलेली मिरची त्यात घाला.त्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण चांगलं मळून घ्या. पाण्याची आवश्यकता हे पीठ मळताना लागत नाही, पण गरज पडल्यास त्यात तुम्ही पाणी घालू शकता. हे पीठ मळून झालयास १५-२० मिनिटं नीट झाकून ठेवा. यानंतर हाताला थोडंसं पाणी पाणी लावून पीठ पुन्हा मऊ मळून घ्या. या पिठाचे लहान लहान गोळे करा त्यानंतर त्याच्या एक सारख्या पुऱ्या लाटा. यानंतर कढईत तेल कडून घ्या व तेल चांगलं गरम करा. तेल गरम झाल्यावर या तेलात पुऱ्या चांगल्या खरपूसपणे तळून घ्या.दोन्ही बाजूने पुऱ्या तळून घेतल्यावर त्या ताटात काढून घ्या. या गरमागरम पुऱ्या तुम्ही दही किंवा बटाट्याच्या भाजीसोबत देखील खाऊ शकता.

हे ही वाचा: 

लवकरच भारतात जगातील सर्वात मोठं जहाज पोहोचणार

दिल्ली पुन्हा भूकंप – ३.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version