तुम्हाला सफरचं आवडतच असेल तर, आज आपण सफरचंदापासून खीर कशी बनवतात हे पाहू

तुम्हाला सफरचं आवडतच असेल तर, आज आपण सफरचंदापासून खीर कशी बनवतात हे पाहू

सफरचंद हे फळ सर्वाना आवडते. सफरचंदामुळे आरोग्याला खूप फायदे होतात. सफरचंदमधील क्वरसिटीन पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वाचवितो. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असते जे पचनशक्ती वाढण्यास मदत करते. सफरचंद जर त्याच्या सालीसह खाल्ले तर त्यामुळे कफ ही बरा होतो . सफरचंद मध्ये फायबर असल्याने दात चांगले राहतात. यात एन्टीव्हायरल प्रॉपर्टीज असतात ज्या किटाणू आणि विषाणूपासून दूर ठेवतात. रोज खाल्ल्याने कोणतेच आजार, रोग होत नाहीत. सफरचंद खाल्याने मुतखड्याचा आजार दूर होतो. सफरचंद सेवन हृदयासाठी खूप चांगलं आहे. त्यामुळं बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. मात्र, सकाळी सफरचंदाचं खाल्ल्यास त्याचा अधिक फायदा होतो. याचं कारण म्हणजे सफरचंदात फायबर आणि पेक्टिन मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं रात्रीच्या वेळी याचं सेवन केल्यास ते पचण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळं सकाळची वेळ याचं सेवन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ असू शकते.

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्ययामुळे, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा शिवप्रेमीचा मोर्चा थंडावला

सफरचंदाची खीर –

रेसिपी –

साहित्य –

१ सफरचंद

काजू

बदाम

मनुके

साखर

केसर

वेलीची पूड

दूध अर्धा लिटर

कृती –

सर्व प्रथम सफरचंद खिसुन घेणे. आणि त्यानंतर दूध गरम करून घेणे दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू , बदाम , मनुके , वेलीची पूड , घालून घेणे आणि दूध चांगले आटून घेणे त्यांनतर सफरचंद चांगले पॅन मध्ये परतून घेणे आणि त्यांमध्ये साखर टाकणे साखर टाकल्यानंतर परत एकदा सफरचंद परतून घेणे. त्यानंतर तयार केलेले मिश्रण दुधामध्ये घालून ४ ते ५ मिनिटे ढवळून घेणे.

हेही वाचा : 

जान्हवी कपूरचा वनपीस मधला बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

Exit mobile version