पारंपरिक आणि तुमच्या डाएट कंट्रोलमध्ये ठेवणारे पौष्टिक मोदक

पारंपरिक आणि तुमच्या डाएट कंट्रोलमध्ये ठेवणारे पौष्टिक मोदक

गणेशोत्सवात विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ नैवेद्य म्हणून बनवता येऊ शकतात. पारंपरिक आणि विस्मरणात गेलेला पदार्थ म्हणजे उंडलकाल. तुम्हाला जर उकडीचे मोदक करायला जमत नसेल किंवा काही कारणाने तुमचे मोदक बिघडत असतील तर उंडलकाल हा उत्तम पर्याय आहे. आणि आपल्यासाठी हा पदार्थ पौष्टिक देखील आहे.

उकडीच्या मोदकासाठी उकड काढून घेतो अगदी तसंच उंडलकालसाठीदेखील तांदळाची उकड काढून घ्यायची. त्याचे गोळे करून ते तुपात तळून घ्यायचे. त्याला मोत्यासारखा रंग येतो. नंतर तव्यावर तूप गरम करून त्यात सुकामेवा, ओल्या नारळाचा चव आणि गूळ घालून मिश्रण करून घ्यायचं. त्यात ते गोळे घालायचे.

हेही वाचा : 

अमोल कोल्हेंचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

तुमचा रोजचा आहार व्यवस्थित असेल तर सणासुदीच्या काळात तुम्ही गोडधड खाण्यास काहीच हरकत नाही. पण तुम्हाला तुमचे डाएट अगदीच मोडू द्यायचे नसेल तर तुम्ही नैवेद्ययुक्त जेवणाचा मनमुराद आनंद घ्या आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या आहाइत सालाड किंवा स्प्राऊट या गोष्टींचा समावेश करा.

आगरी-कोळी संस्कृतीतील शेवपा गोऱ्या हा रुचकर पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच खाऊ शकतात. प्रत्येक प्रांतात त्याला तसे विविध नावं आहेत. तांदळाची उकड काढून त्याची शेव पाडून सात-आठ मिनिटं वाफवून घ्यायची, हे झालं शेवपा. गोऱ्या म्हणजे साबुदाण्याची खीर. साबुदाणा भिजवून घ्यायचा आणि नंतर शिजवायचा. तुम्ही जर एक कप साबुदाणा घेतला असेल तर अर्धा कप ओल्या नारळाचा चव घ्यायचा. दूध घालायचं आणि सगळं छान शिजवून घेऊन गॅस बंद करायचा. शेवटी गूळ, साजूक तूप आणि सुकामेवा घालायचा.

गणेशोत्सवात बेस्ट बसकडून प्रवाशांसाठी खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती

Exit mobile version