बटाट्याचे नाही तर हिवाळ्यात हेल्दी गाजर फ्रेंच फ्राईज नक्की करा टेस्ट

थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं.

बटाट्याचे नाही तर हिवाळ्यात हेल्दी गाजर फ्रेंच फ्राईज नक्की करा टेस्ट

थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढतात. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.

हिवाळ्यात अनेक प्रकारची सिजनल फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजर हे त्यापैकीच एक. हिवाळयात गाजर मुबलक प्रमाणात बाजारात उपल्बध असतात. गाजराचे सेवन तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. फ्रेंच फ्राईजच्या स्वरूपातही तुम्ही गाजर खाऊ शकता. ही एक खूप निरोगी आणि चवदार रेसिपी आहे. ही रेसिपी बनवायला देखील खूप सोपी आहे. गाजर फ्रेंच फ्राईज तुम्ही घरी सहज बनवू शकता. ते खायला खूप मसालेदार आणि कुरकुरीत असतात. मुलांना हे फ्रेंच फ्राईज खूप आवडतील. ते तुम्ही घरी कसे बनवू शकता.

गाजराचे सेवन तुम्ही अनेक प्रकारे करू शकता. फ्रेंच फ्राईजच्या स्वरूपातही तुम्ही गाजर खाऊ शकता. ही एक खूप निरोगी आणि चवदार रेसिपी आहे. ही रेसिपी बनवायला देखील खूप सोपी आहे. गाजर फ्रेंच फ्राईज तुम्ही घरी सहज बनवू शकता. ते खायला खूप मसालेदार आणि कुरकुरीत असतात. तुमच्या मुलांना हे फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडतील. आजच्या लेखात आपण घरच्या घरी हेल्दी गाजर फ्रेंच फ्राईज कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य – 

कृती – 

सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्यावे. त्यांना फ्राईजच्या आकारात कापून घ्या. यानंतर, त्यांना उकळलेल्या पाण्यात 3 मिनिटे उकळून घ्या. या फ्राईजला हलके उकडू द्या. यानंतर, त्यांना पाण्यातून बाहेर काढा आणि त्यांना थंड होऊ द्या.एका भांड्यात एक चमचा कॉर्न स्टार्च घ्या. त्यात टीस्पून काळी मिरी पावडर घाला. त्यात चवीनुसार मीठ घालावे. या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता या मिश्रणात उकडलेले गाजर टाकून त्याला छान कोट करा.आता कढईत तेल गरम करा. गरम तेलात हे फ्राईज तळून घ्या. यानंतर तुम्ही हे गाजर फ्राईज टोमॅटो सॉससोबत खाण्यास देऊ शकता.

हे ही वाचा : 

लग्नात स्लिम दिसायचंय ? तर वजन कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

ऍसिडिटीचा त्रासाने त्रस्त आहात ? मग करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version