तोंडाला चव आणण्यासाठी घरी बनवून पाहा लसणीच्या पातीचा ठेचा

ठेचा म्हटलं कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटत.

तोंडाला चव आणण्यासाठी घरी बनवून पाहा लसणीच्या पातीचा ठेचा

ठेचा म्हटलं कि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटत. हिरव्या गार मिरच्या आणि जोडीला लसूण हे कॉम्बिनेशन अगदी छान लागत. रोजच्या जेवणात जर तोंडी लावण्यासाठी ठेचा असेल तर दोन घास जेवण जास्त जात. जेवण साधं असलं तरी ठेचाच्या चवीने जेवण छान लागत. जर तुम्ही ठेचा प्रेमी असाल किंवा तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही घरी लसणीच्या पातीचा ठेवा नक्की बनवू शकता. काही मोजके पदार्थ वापरून आपण हा ठेचा बनवू शकतो. चला तर पाहुयात लसणीच्या पातीचा ठेचा कसा बनवतात ते..

साहित्य:-

लसणीची पात
५ ते ६ हिरव्या मिरच्या
अर्धा लिंबाचा रस
चवीनुसार मीठ

कृती:-

सर्वप्रथम लसणीच्या पातीचा ठेचा बनवण्यासाठी लसणीची पात स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मिरच्या घालून त्या चांगल्या लालसर होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर थोड्या थंड करा. नंतर एका खलबत्यामध्ये मिरच्या आणि लसणीची पात कुटून घ्या. जडबरीक कुटून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून नीट मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार आहे खमंग झणझणीत लसणीच्या पातीचा ठेचा.

हे ही वाचा:

मराठी पडदा गाजवायला सज्ज, नवरा माझा नवसाचा २ मध्ये पुन्हा एकत्र येणारं अशोक सराफ-सचिन पिळगावकर

आपल्या बापाशी बेइमानी करणारी पहिले अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे : रामदास कदम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version