उरलेल्या भातापासून तयार करून पाहा इन्स्टंट पेपर डोसे

भारतीय पदार्थांमध्ये भात हा प्रामुख्याने सर्वच घरांमध्ये खाल्ला जातो.

उरलेल्या भातापासून तयार करून पाहा इन्स्टंट पेपर डोसे

भारतीय पदार्थांमध्ये भात हा प्रामुख्याने सर्वच घरांमध्ये खाल्ला जातो. भाताशिवाय जेवण पूर्णच होत नाही. अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रत्येक थाळीमध्ये भात हा मुख्य पदार्थ आहे. पण अनेकदा रात्रीच्या जेवणात भात जास्त बनवला जातो. हा उरलेला भात चिकट आणि थंड होतो. हा थंड झालेला भात अनेकांना खाण्यासाठी आवडत नाही. मग उरलेल्या भातापासून नेमका कोणता पदार्थ बनवायचा? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना. तर तुम्ही उरलेल्या भातापासून कुरकुरीत डोसे बनवू शकता. जर तुम्हाला भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही भातापासून पेपर डोसे नक्की बनवून पाहा जाणून घ्या रेसिपी..

साहित्य:-

रवा, दही , उरलेला भात, मीठ , तांदुळाचे पीठ , बेकिंग सोडा

कृती:-

सर्वप्रथम भाताचे डोसे बनवण्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये एक वाटी रवा, एका वाटी दही, एक वाटी भात आणि एक वाटी पाणी हे सर्व मिश्रण तयार करून घ्या. आपण जसे डोसे बनवण्यासाठी मिश्रण करतो तसे मिश्रण बनवून घ्या. नंतर तयार पीठ १५ ते २० मिनिटं ठेवून घ्या. जेणेकरून पीठ छान फुलून येईल. २० मिनिटं झाल्यानंतर त्यात तांदुळाचे पीठ, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिश्रण नीट मिक्स करून घ्या. तवा गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घ्या. तेल थोडे गरम झाले की चमच्याने मिश्रण तव्यावर पसरवून घ्या. जर तुम्हाला डोसा कुरकुरीत हवा असेल तर पातळ लेअर तयार करा. दोन्ही बाजूने डोसा नीट भाजल्यानंतर डोसा काढून घ्या. हा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Exit mobile version