भोपळ्याची भाजी आवडत नाही मग ‘ही’ रेसिपी नक्की ट्राय करा…

प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार जेवण बनवणे म्हणजे ही घरातल्या स्त्रीची तारेवरची कसरत असते. त्यात भोपळ्याची भाजी म्हंटले की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. पण आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशा भोपळ्याची एक वेगळी रेसिपी बनवली तर मात्र सगळेच जण चवीने खातील. अगदी सोप्या पद्धतीने बनवा भोपळ्याची भजी आणि मिळवा टेस्ट सोबतच हेल्थ.

भोपळ्याची भजी बनवण्यासाठी तुम्हाला खालील साहित्य लागेल:

साहित्य:

– १ कप पातळ कापलेला भोपळा
– १ कप बेसन (चणाडाळ पीठ)
– १ चमचा तांदूळ पीठ
– १/२ चमचा हळद
– १/२ चमचा लाल तिखट
– १/२ चमचा जिरे
– १/४ चमचा हिंग
– चवीनुसार मीठ
– पाणी
– तळण्यासाठी तेल

 कृती:

1. भोपळ्याचे काप धुवून कोरडे करा.
2. एका बाऊलमध्ये बेसन, तांदूळ पीठ, हळद, लाल तिखट, जिरे, हिंग, आणि मीठ घाला.
3. या मिश्रणात थोडेसे पाणी घालून गुठळी न होता पीठ तयार करा. पिठाची कंसिस्टेंसी भजीच्या पिठासारखी असावी.
4. भोपळ्याचे काप तयार पिठात बुडवून घ्या.
5. कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर भोपळ्याचे काप एक एक करून तळा.
6. भजी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
7. तळलेल्या भाज्यांना कागदावर ठेवून जास्तीचे तेल काढा.
8. गरमागरम भजी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.
Exit mobile version