Thursday, July 4, 2024

Latest Posts

चपाती आवडत नाही? मग चपातीला द्या मसाल्याचा ट्विस्ट

चपाती हा सर्वांच्या घरात बनवला जाणारा पदार्थ आहे. सकाळचा नाश्ता असो किंवा जेवण चपाती हा सर्वांच्या घरात बनवला बनवला पदार्थ आहे. सकाळी नाश्त्याला चहा चपाती खाल्ली की दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरलेले राहतं. काही वेळा सकाळच्या नाश्त्याला उपमा, पोहे खाऊन कंटाळा येतो. तसेच सकाळी कामाच्या गडबडीत आपल्याला वेगळा नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशावेळी झटपट आणि चविष्ट मसाला चपाती बनवून तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता. आपण रोज जशी कणिक मळून चपाती बनवतो, त्याच चपातीला थोडा मसाल्याचा ट्विस्ट दिला तर सकाळचा नाश्ता चटपटीत होऊ शकतो. मसाला चपाती बनवताना वेगळे असे कोणते साहित्य लागत नाही. घरात रोजच्याच वापरातले साहित्य वापरून मसाला चपाती कशी बनवायची याची रेसेपी पाहुयात.

गव्हाच्या पिठापासून मसाला चपाती कशी बनवायची?

साहित्य:

  • गव्हाचे पीठ- ४ कप
  • काश्मिरी लाल तिखट- १ टी स्पून
  • हळद- १/२ टी स्पून
  • धणेपूड- १/२ टी स्पून
  • जिरेपूड- १/२ टी स्पून
  • चाट मसाला-१/४ टी स्पून
  • कसुरी मेथी- १ टी स्पून
  • सफेद तीळ- १ टी स्पून
  • कोथिंबीर- १/२ कप (बारीक चिरलेली)
  • साजूक तूप- २ टी स्पून
  • मीठ चवीनुसार
  • पाणी गरजेनुसार 
  • तेल गरजेनुसार

कृती:

  • सर्वप्रथम नेहमीप्रमाणे चपातीचे कणिक मळून घेतो तसे कणिक मळून घ्यावी. कणिक मळताना त्यात गरजेनुसार पाणी व तेल घालून मऊसूत कणिक मळून घ्यावी.
  • आता एका भांड्यात हळद, काश्मिरी लाल तिखट, धने-जिरे पूड, कसुरी मेथी, मीठ, चाट मसाला घालून एकत्र करून घ्यावा.
  • आता कणकेचे छोटे-छोटे गोळे करून त्याच्या गोल चपात्या लाटून घ्याव्यात.
  • लाटलेल्या चपातीवर साजूक तुपाचे काही थेंब टाकून पसरून घ्या. त्यावर तयार केलेला मसाला, सफेद तीळ आणि कापलेली कोथिंबीर पसरून घ्या.
  • लाटून झालेल्या चपातीचा रोल करून घ्या आणि पुन्हा गोलाकार लाटून घ्या.
  • एका बाजूला तवा गरम करायला ठेवा आणि त्यावर लाटलेली मसाला चपाती दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • चपाती भाजताना बाजूने तेलाचे काही थेंब टाका.
  • गरमागरम मसाला चपाती सॉससोबत खायला तयार आहे.

 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss