Sunday, September 1, 2024

Latest Posts

आषाढी एकादशी निमित्त घरच्या घरी बनवा सोपी रताळ्याची खीर…

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना रताळी खायला आवडतात. चवीला गोड असणारी रताळी लहान मुले आवडीने खातात. रताळी हे एक आयुर्वेदिक कंदमूळ असून उकडलेली रताळी खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना रताळी खायला आवडतात. चवीला गोड असणारी रताळी लहान मुले आवडीने खातात. रताळी हे एक आयुर्वेदिक कंदमूळ असून उकडलेली रताळी खाल्ल्याने आरोग्याला फायदे होतात. यामध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर यांसारखे पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. उपवासाच्या दिवशीसुद्धा रताळ्याचे सेवन केले जाते. यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने अनेक लोक उपवास करतात. उपवासाच्या दिवशी आपण साबुदाण्याची खिचडी, वडे किंवा इतर पदार्थ बनवून खातो. त्यामुळे आज तुम्हाला रताळ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. येणाऱ्या आषाढी एकादशीला रताळ्याची खीर नक्की बनवून पहा. हा पदार्थ तुम्ही पाहुणे घरात आल्यानंतर सुद्धा बनवू शकता. चला तर मग पौष्टिक रताळ्याची खीर कशी बनवायची याची रेसिपी पाहूया.

रताळ्याची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • रताळी- २ ते ३
  • साजूक तूप- ३ टी स्पून
  • गूळ- १/२ वाटी
  • दूध- २ वाट्या
  • वेलची पूड- १/४ टी स्पून
  • जायफळ पूड- चिमूटभर
  • काजू, बदाम, मनुके- २ ते ३ चमचे

कृती:

  • सर्वप्रथम रताळी स्वच्छ पाण्याने धुवून उकडून घ्या.
  • रताळी थंड झाल्यावर त्यांची सालं काढून घ्या.
  • सालं काढून झाल्यावर रताळी एका भांड्यात व्यवस्थित कुस्करून घ्या. यामध्ये अखंड तुकडे टाकू नये.
  • एका कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यात उकडलेली रताळी टाकून घ्या.
  • रताळी टाकल्यानंतर लगेचच दूध टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • वरील मिश्रण एकत्र करून झाल्यावर त्यात गूळ टाका. गुळाऐवजी साखरेचा देखील वापर करू शकता.
  • गूळ विरघळल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • वरील मिश्रण शिजत आले की त्यात काजू, बदाम आणि मनुकांचे बारीक तुकडे घालून २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या.
  • नंतर गॅस बंद करा.
  • रताळ्याची खीर साधारण तापमानात आल्यावर फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून देखील खाऊ शकता.

“माझिया प्रियाला प्रित कळेना” मालिकेतील अभिनेत्रीचा पुन्हा कमबॅक ?

Latest Posts

Don't Miss