हरभऱ्याचा शिरा खास बाप्पासाठी नैवेद्य

हरभऱ्याचा उपयोग मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त असतो. हरभमुऱ्यामुळे रक्ताची पातळी प्रमाणात राहते. हरभऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते.

हरभऱ्याचा शिरा खास बाप्पासाठी नैवेद्य

आपण नैवेद्यसाठी रव्याचा शिरा,मूगडाळीचा शिरा असे वेगवेगळे प्रकारचे शिरे करत असतो. हरभरा खाल्ल्यामुळे शरीरातील ऊर्जाशक्ती वाढविण्यास मदत करते.हरभऱ्यात प्रथिने मुबलक प्रमाणात असतात आणि हरभरा हाडांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. हरभऱ्याचा उपयोग मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त असतो. हरभमुऱ्यामुळे रक्ताची पातळी प्रमाणात राहते. हरभऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते. हरभऱ्यात फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पोट साफ करण्यास मदत होते हरभऱ्यात लोह,प्रथिने,आणि फोलेट अशी पोषक द्रव्ये असतात. यामुळे हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्यास मदत होते. हरबरा डाळ हे पचण्यास जड,आणि तुरट-गोड चवीचे असते. तरीपण हरभरा जास्त प्रमाणात खाऊ नये, त्याचे सेवन कमी प्रमाणात करावे. ओल्या हरभऱ्याच्या पानात लोह मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं शरीरात लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी हरभऱ्याच्या पानांची भाजी खावी. भाजलेले हरभरे उत्तर भारतात भरपूर वापरले जातात. हा येथील लोकप्रिय स्नॅक्स आहे. त्याचे सालीसोबत सेवन करणे चांगले मानले जाते.तुमचे वजन जास्त असेल तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता.तर आज आपण जाणून घेऊया हरभऱ्याचा शिरा कसा बनवायचा.

रेसिपी –

साहित्य –

१ कप हरभरा डाळ ( रात्रभर भिजत ठेवणे )

तूप ( १ कप )

काजू बदाम

केसर

३ कप दूध

१ कप साखर

१ कप दुधाची साय

कृती –

सर्व प्रथम कढईमध्ये तूप घालून घेणे त्यानंतर तूपामध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ भाजून घेणे. भाजून घेतल्यानंतर डाळ मिक्सर मध्ये वाटून बारीक करून घेणे. त्यानंतर परत कढई मध्ये तूप घालून बारीक वाटलेली डाळ चांगली भाजून घेणे. आणि परत तूप घालणे. त्यामध्ये थोडे दूध घालणे आणि मिश्रण चांगले ढवळून घेणे. परत दूध घालणे.आणि मिश्रण सारखे सारखे ढवळत राहणे.त्यानंतर दुधाची साय घालून मिश्रण परत एकदा ढवळून घेणे. त्यानंतर साखर टाकणे. मग परत एकदा तूप आणि काजू बदाम घालून घेणे.त्यानंतर मिश्रण एकजीव करून घेणे आणि शिरा तयार झाल्यानंतर वरून केसर घालणे आणि बाप्पाच्या नैवेद्यसाठी प्रसाद तयार आहे.

हे ही वाचा:

आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version