spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vegan food वेगन पदार्थ म्हणजे काय ? जाणून घ्या

Vegan food : वेगन फूड म्हणजे शाहाकारी पदार्थ. तसेच १ नोव्हेंबरला वेगन फूड (World Vegan food) हा दिवस साजरा केला जातो. फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रूट या गोष्टी वेगन फूड मध्ये वापल्या जातात. खरतर वेगन फूडमध्ये दुधाचे पदार्थ वापरले जात नाही. कारण गायीपासून जास्त प्रमाणात दूध मिळवण्यासाठी गाईला खाण्यासाठी आणि पिण्यासाठी जेवढे पाणी दिले जात नाही त्यापेक्षा जास्त पाणी तिला खाण्यासाठी लागणारा चारा उगवण्यासाठी दिले जाते , यामुळे पर्यावरणाची हानी होते.

 

तसेच वेगन फूड मध्ये मांसाहारी पदार्थ आणि दुधाचे पदार्थ वापरले जात नाही. या देशात अनेक लोक आहेत जे वेगन पदार्थांचा वापर करतात. जसे की आलिया भट (Alia Bhatt) , सोनम कपूर (Sonam Kapoor) , सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) , विराट कोहली (Virat Kohli) इत्यादी. बहुतेक लोकांना मांसाहारी पदार्थाचे सेवन करायला आवडत नाही. त्याची कमी भरून काढण्यासाठी बहुतेक लोक डाएटमध्ये फळे, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स अश्या गोष्टीचा वापर करतात.

वेगन डाएटमध्ये व्हिटॅमिन्स प्रोटीन फायबर असे गुणधर्म आढळून येते जे वजन कमी करण्यास मदत करते. तसेच वेगन डाएटमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला देखील मिळतात. जसे की Whole Wheat Vegan Diet , Raw Food Vegan Diet, Thrive Diet असे प्रकार पाहायला मिळतात. या वेगन फूड मध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी वेगन फूडचा वापर करू शकता. वेगन फूड हे चवीला खूप स्वादिष्ट लागते. शरीरातील साखरेचे प्रमाण तुम्हाला जर नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही या फूडचे सेवन करू शकता. वेगन डाएटमुळे किडनीचे कार्य (Kidney function) देखील सुधारते. आणि शरीर देखील निरोगी राहते.

हे ही वाचा:

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss