spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वजन कमी करायचे आहे? मग नाश्त्याला बनवा Oats Tikki

ओट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही ओट्स खाणे तुमच्या शरीरासाठी फायद्याचे ठरू शकते.

ओट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही ओट्स खाणे तुमच्या शरीरासाठी फायद्याचे ठरू शकते. मात्र अनेकदा हे ओट्स खायला कंटाळा येतो, तसेच अनेकांना त्याची चव आवडत नाही. पण तुम्ही याच ओट्सपासून चविष्ट अशी टिक्की बनवून खाऊ शकता. ही टिक्की तुम्ही तुमच्या घरी अगदी सहज बनवू शकता. तसेच यामुळे संपूर्ण दिवस तुमचे पोटही भरलेले राहील आणि तुमचे वजन कमी होण्यासही मदत होईल. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य –

– ओट्स फ्लोअर (Oats flour)
– पनीर (Cheese)
– रताळे (Sweet potatoes)
– मिक्स भाज्या (Mix vegetables)
– लाल शिमला मिरची (Red capsicum)
– मिरची (Chili)
– कोबी (Cabbage)
– कांदा (Onion)
– बीन्स (Beans)
– आले (Ginger)
– मीठ (Salt)
– सैंधव मीठ (Saindhava salt)
– लाल मिरची पावडर (Red Chilli Powder)
– हळद (Turmeric)
– चाट मसाला (Chaat masala)
– कोथिंबीर (Coriander)
– लिंबू (Lemon)

कृती –

ओट्स टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम एक भांडे घ्या. आता या भांड्यात पनीर किसून घाला. त्यानंतर कुकरमध्ये बटाटे आणि रताळे उकडून, हे उकडलेले बटाटे आणि रताळे नीट मॅश करून भांडयात घाला. आता त्यात आलं, मीठ, सैंधव मीठ, ओट्स फ्लोअर, लाल तिखट, हळद, चाट मसाला, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. त्यासोबतच बारीक चिरलेल्या भाज्या घाला. यानंतर सर्वकाही चांगले एकजीव करा आणि नंतर या मिश्रणातील काही भाग घेऊन तुमच्या आवडीच्या आकाराच्या टिक्की बनवा. यानंतर आता गॅसवर एक नॉन-स्टिक पॅन ठेवून हा नॉन-स्टिक पॅन गरम झाला की, त्यावर थोडं तेल लावून गरम होऊ द्या. ते गरम झाल्यावर त्यात एक एक टिक्की टाका आणि दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नीट खरपूस भाजून घ्या. आता ओट्स टिक्की तयार आहे. तुम्ही ही ओट्स टिक्की पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा:

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा Crispy Poha Nuggets

अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सेन्सॉर बोर्डकडून चित्रपटात बदल

केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट दरम्यान संसदेत होणार चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss