Tuesday, September 3, 2024

Latest Posts

हिवाळ्यात आहार कसा असावा??

हिवाळ्यात हवामान थंड असत . उष्ण पदार्थ खाल्याने शरीरातली ऊर्जा टिकून राहते . शारीरिक हालचाल body movement व्यवस्थित होण्यास मदत होते . आहाराचे योग्य प्रमाणात संतुलन असल्यास व्यवस्थित भूक लागते व आपली पचनसंस्था हि सदृढ राहते . हिवाळ्यात शक्यतो स्निग्ध उष्ण आहार घ्यावा .हिवाळ्यात काय व कसे खावे
हिवाळ्यात दूध दुग्धजन्य पदार्थ , सुकामेवा, पालेभाजि. , मांसाहार , फळे ,कडधान्य सोबत जेवणात बाजरी , ज्वारी ,गहू ह्या धान्यापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश असावा. भाकरी सोबत तूप , लोणी लोन्च, तूर ,उडीद, कुळीथ इत्यादी पदार्थांना समाविष्ट करा . .

हेही वाचा:

Team India ला विजय मिळवून देत R Ashwin ने केला मोठ्ठा पराक्रम!

का खावेत दुग्धजन्य पदार्थ
दूध तूप लोणी या पदार्थात भरपूर प्रमाणात ऊर्जा आणि कॅलरी असतात . हिवाळ्यात उष्णतेचा समतोल राखण्यास मदत होते .
मांसाहार: मांसाहार खाणाऱ्या व्यक्तींनी हिवाळ्यात मास, मच्ची, चिकन ,अंडी असे पदार्थ खावेत ,फक्त मास खाताना त्यातील चरबी खाऊ नये . अंडी खाताना त्यातील पिवळं बलक खाऊ नये .मसाले : विविध मसाल्याचे पदार्थ हे उष्ण असतात त्यामुळे आहारात तीळ ,लसूण, मोहरी ,तमालपत्र, आले ,हिंग ,जिरा, समावेश करावा . मसाले वापरून विविध दुग्धजन्य पदार्थ खावेत . हिवाळ्यात तिळाचे लाडू , तिळाची चटणी , तिळाच्या इतर पदार्थाचा आहारात समावेश करावा .

हेही वाचा:

राहुल शेवाळेंच्या आरोपाला रुपाली ठोंबरेंच प्रतिउत्तर

पाणी: हिवाळ्यात सहसा कोमट पाणी प्यावे त्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते
हिवाळी काळ शरीराच्या दृष्टीने खूप लाभकारक असतो . त्यामुळे योग्य तो आहार घेऊन शरीरास सदृढ बनवता येते .
आहारासोबत शरीराला व्यायामाची सवय लावावी त्यामुळे हिवाळी दिवसात लठ्ठपणा आणि आजारांपासून लांब राहता येते .
हिवाळ्यात गुळ खाण्याचे वेगळे फायदे असतात . गूळ हा उसाच्या रसापासून आटवून बनवला जातो . गूळ तयार करताना गुळामध्ये पोषकतत्वे ,क्षार, व्हिटॅमिन ,हे टिकून राहतात . गुळाचे बऱ्याच अंगाने शरीराला फायदे होतात. लोह, मँगनेशियम , पोट्याशियम ,तांब ,व्हिटॅमिन B यासारखे घटकही असतात .

 

Latest Posts

Don't Miss