spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य १ सप्टेंबर २०२२, धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल

मेष : विवाह इच्छूकांसाठी आनंददायी दिवस आहे. नववराला साजेशी वधू तर नववधूला साजेसा वर प्राप्त होऊ शकेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील . आरोग्यविषयक तक्रारी चालूच रहातील. मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. शक्यतो वाहन चालवणे टाळा . धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल. पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ होतील.

वृषभ : मामा- मावशी किंवा आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील . शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. राजकीय क्षेत्रात अधिक जबाबदाऱ्या वाढतील. संतुलित आणि सकस आहार घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील.

मिथुन : विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त सकारात्मक वातावरण तयार होईल. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळाल . संतती विषयक समस्या दूर होतील.लेखक -पत्रकार मंडळींकडून समाजाला पोषक लेखन घडून येईल. काही प्रमाणात पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते. जलमार्गाने केलेल्या प्रवासातून लाभ होईल.

कर्क : चतुष्पाद प्राण्यांच्या देखभाली विषयी जागरूक रहावे. वाहन खरेदी करताना भविष्यातील साद पडसादाचे अवलोकन करूनच पाऊल उचलावे.संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान लाभेल. विविधांगी वाचनाची आवड वाढेल . धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी कीर्तन प्रवचनादी प्रबोधनात्मक अनमोल मार्गदर्शन करू शकाल.

सिंह : स्वकर्तुत्वाने मोठे होण्याबद्दलचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. साहसी खेळ -योगशास्त्र याविषयातील स्वारस्य वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील. वयोवृद्ध मंडळींनी प्रकृतीची काळजी घेण्याची अत्यन्त आवश्यकता वाटते. जमिनीपासून फायदा होईल.

कन्या : आर्थिक व्यवहारात कोणाचीही हमी घेऊ नका . लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल.आपण कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार, त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका . न्यायालयीन प्रक्रियेत यश संपादन कराल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेच्या वाटाघाटी यशस्वी होतील.

तुला : वैचारिक पातळीत सुधारणा होईल. मात्र बदलत्या विचार सरणीचा इतर लोक गैर फायदा घेऊ शकतात. आपण आपले मत आणि निर्णयावर ठाम रहा.आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. वाणीतून अमोघ शब्दांचा वर्षाव करू शकाल. शब्द सामर्थ्य वाढेल

वृश्चिक : आर्थिक व्यवहाराबाबत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. येऊ घातलेल्या संकटांवर मार्ग निघेल. शेतकऱ्यांसाठी अत्यन्त दिलासादायक काळ आहे. अन्नधान्याची भरभराट होईल. शेती विषयक कोणतेही काम करताना उत्साह वाढेल.

धनु : योग्य संधीचा फायदा घेण्याची तसदी घ्या. अकारण होणाऱ्या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनाधीनतेकडे पाऊल पडण्याची शक्यता आहे. प्राण्यांच्या खरेदी विक्रीत फायदा होईल. शेतीतील उत्पादनाच्या सुरक्षेची काळजी घ्या. पारंपरिक उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करा. मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी कार्यरत रहा.

मकर : परदेशातील व्यवहार सुरळीत होतील . आज अधिकचा प्रवास करावा लागेल. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सहज पेलवू शकाल. नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल. गुडघे दुखीचे विकार त्रासदायक ठरतील.

कुंभ : समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. पीडितांना न्याय मिळवून द्याल. राजदरबारात सन्मानित केले जाईल. आपण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सामाजिक घडी सुस्थितीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील.

मीन : मनावरील तान काहीसा हलका होईल. तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे. आपल्या हातून सत्कर्म घडेल. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल. जल तत्वांशी संबंधित उद्योग व्यवसायात फायदा होईल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्यावी .

Latest Posts

Don't Miss